जो डर गया वो मर गया, वो बच गया जो घर गया
क्वारंटाईनचे दिवस या लेखमालेतील हा 3 रा लेख. खरतर मी दररोज घडणार्या घडामोंडीच्या विसंगीवर बोट ठेवुन थोडसं प्रबोधनात्मक , टीकात्मक व चिकित्सक अंगाने लेख लिहायचा निर्णय घेतलाय . याला उत्तम प्रतिसादही मिळतोय पण आज काही मित्रमैत्रीणींचे मैसेज आले व त्यांनी कोरोना रोगाबद्दल व त्याची लक्षणे वा घ्यावयाची काळजी इ. बद्दल माझ्याकडुन लिहिलेलं वाचायला आवडेल असं नोंदवल. आता मी काही वैद्यकीय क्षेत्रातला तज्ञ वगैरे नाही. पण सर्वांच्या आग्रहाखातर लिहीत आहे. या आजाराच्या वैज्ञानिक विश्लेषणाकडं जाण्यापुर्वी मला जरा तुमच्या माझ्या मानसिकतेत डोकावसं वाटतय. विचारवंताच्या व वैद्यकीय तज्ञांच्या मते आपले बरेचसे आजार हे मानसिक असतात. कारण आपण सेल्फ प्रोग्रामड प्राणी आहोत. आजुबाजुच्या ठिकाणाहुन आपल्या ज्ञानेंद्रियाद्वारे मिळविलेल्या माहितीनुसार आपल्या धारणा बनतात व आपण त्याप्रमाणे वागतो. पण या धारणांमध्ये कितपत सत्यता आहे हे पडताळणे आपले काम आहे. पण सहसा आपण तस करीत नाही. आपण आपल्या धारणांना तपासायच्या भानगडीत कधी पडतच नाही.कारण तसं करायला आपल्याला आजपर्यंत कुणी शिकवलच नाही. जास्त किचकट होत असेल तर आपण तुमच माझंच उदाहरण घेवुया. सध्या कोरोनामुळं प्रचंड घबराटीचं वातावरण आजुबाजुला आहे. सातत्याने कोरोना कोरोना म्हणुन विदेशी म्यृत्युचे आकडे देत किंचाळणारा मेडिया, लॉकडाउन झालेलं तुमच माझ शहर, पोलिसांचा वावर इ दृश्य आणि घटनांमुळ आपली अशी धारणा बनलीय की कोरोना म्हणजे मृत्युशीच गाठ. हे खरही आहे. पण करोना संसर्ग ते मृत्यु हा एवढा सहज प्रवास नाही. कोरोनासाठीही आणि तुमच्या माझ्यासाठीही. कारण कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर या रोगातुन बरे झालेले 2 नागरिक हे पुण्याचे आहेत हे समोर आलंय. म्हणजे कोरोनातुन वाचणही शक्य आहे. दुसरा मुद्दा यामागचा कोरोना हा रोगही इतर रोगाप्रमाणेच आहे. जसे की सार्स, HIV, फ्लु एनफ्लुएंजा, इ. या रोगानेही माणुस मरतो आणि कोरोनानेही मरतो. HIV चं उदाहरण मला वाटतय कोरोनाशी मिळत जब्त आहे. एड्स तुमची इम्युनिटी पावर कमी करत. कोरोनाही तेच करतो. ज्यांची इम्युनिटी पावर जास्त आहे .ते यातुन वाचुही शकतात. कोरोनाची प्राथमिक लक्षण तर तुम्हांला माहिती आहेतच.कोरोना संसर्ग झाला तर 2 ते 15 दिवसाच्या आत ही लक्षण केव्हाही आढळुन येवु शकतात. यात ताप , कोरडा खोकला, सर्दी-पडसे, थकवा येणं ही असु शकतात. काही केसमध्ये तर शेवटपर्यंत लक्षणच दिसुन येत नाहीत. ही या रोगाची सगळ्यात घातक बाजु. कोरोनाचा विषाणु हा वेगवेगळ्या सरफेसवर वेगवेगळ्या काळात जिवंत राहु शकतो. जसे की कपड्यावर 3-4 तास, मानवी शरीरावर, प्लास्टिकवर आदी. या विषाणुचा संसर्ग टाळता यावा यासाठी, वेळोवेळी साबणाने व सैनिटायझरनी हात स्वच्छ धुणे, बाहेरून आल्यावर गरम पाण्यानी कपडे धुणे, इ उपाय करता येतात.पण सर्वात प्रभावी उपाय आहे तो, घराबाहेर न पडण्याचा . कारण हा रोग गुणाकाराने वाढत जातो. हे सगळं जरी असलं तरी पुरेशी काळजी घेत असाल तर कोरोनाला घाबरण्याच काही एक कारण नाही. मला एका व्यक्तीचा किस्सा आठवतोय मागे कधीतरी वाचलेला , यातील व्यक्ती जहाजाच्या डेकवर शांतपणे डार्विनच ओरिजिन ऑफ द स्पेसिज हे पुस्तक वाचत असतो. तेव्हा जहाजाच्या डेकवर जहाजाचा कप्तान ओरडत येतो आणि सांगतो अरे काय माणुस आहे. हे जहाज बुडतय ,काही वेळात या डेकलाही जलसमाधी मिळेल. आणि तु शांतपणे पुस्तक वाचतोयस. तो व्यक्ती निर्विकारपणे कप्तानाकडं पाहतो आणि परत आपलं डोकं पुस्तकात खुपसुन बसतो. काही वेळानं जहाज बुडतं. नेमका फरक हा आहे. कप्तानाच्या मानसिकतेतला आणि त्या मानसाच्या मानसिकतेतला. आता तुम्ही त्या बुडणार्या जहाजाच्या डेकवर पुस्तक वाचणारे व्यक्ती तर नाहीत. भगतसिंग सुद्धा फाशीवर जाण्याआधी कितीशांत होते. हे मनाचे खेळ समजुन घ्या . तुम्ही जर मरणाच्या भयानी पछाडलेले भयभीत असाल तर जिवंतपणीच मेलेले असाल. जर तुम्ही शासनाच्या व वैद्यकीय तज्ञांच्या सुचना ऐकत असाल, पाळत असाल तर घाबरण्याचं कारण नाही. तुमच्या मनातला कोरोना काढुन टाका. क्योंकि जो डर गया समजो वो मर गया पर जो घरपरही रहा वो बच गया.
©️ विक्रांत शंके
लेखक महाराष्ट्र जीवन लाईव्ह समुहात वृत्तनिवेदक म्हणून कार्यरत आहेत.