12 ऑगस्टला 'वंचित'कडून डफली बजाव आंदोलन;लॉकडाउनच्या विरोधात राज्यभर डफली वाजवणार !
पुणे -प्रतिनिधी
10 ऑगस्ट 2020
गेल्या पाच महिन्यापासुन कोविड -19 रोगाची साखळी तोडण्याच्या उद्देशयाने केंद्र व राज्य सरकारकडुन देशभर व राज्यभर लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. मात्र या लॉकडाउनमुळे गोर गरीब सामान्य जनतेची प्रचंड उपासमार होत असुन शासन याकडे लक्ष द्यायला तयार नाही किंवा लॉकडाऊन उठवायलाही तयार नाही तेव्हा याचा निषेध म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राज्यभर लॉकडाउनच्या विरोधात व शासनाच्या निष्क्रियतेच्या विरोधात "डफली बजाव" आंदोलन करण्यात येणार आहे. राज्यातील एसटी सेवा व महानगरातील सार्वजनिक बससेवा सुरू झाल्याच पाहिजे या प्रमुख मागणीला घेऊन हे आंदोलन करण्यात येणार आहे.राज्यात एसटी सेवा बंद असल्याने दळणवळण बंद आहे, परिणामी कामगारांची उपासमार होत आहे, तर दुसरीकडे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पुर्णपणे बंद असुन त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहेत. तेव्हा राज्यातील बससेवा तात्काळ सुरू करण्यात यावी या प्रमुख मागणीला घेऊन राज्यातील एसटी डेपो व शहरातील सार्वजनिक बस डेपो समोर वंचित बहुजन आघाडीच्या पगाधिकारी व कार्यकर्त्यामार्फत डफली वाजवुन आंदोलन करण्यात येणार आहे.हे आंदोलन यशस्वी व्हावे म्हणुन राज्यातील बाजार समिती सदस्य , व्यापारी, रिक्षावाले, दुकानदार, फेरीवाले, लोहार, न्हावी, चांभार इ.घटकाना व संबंधित संघटनांना भेटून या आंदोलनात सामील होण्याची विनंती करावी, असेही आवाहनही यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे.