राज्यात 50 % इतक्या स्वरूपात बससेवा सुरू : प्रवासी सुखावले, डफली बजाव आंदोलनाचे यश
लातूर - प्रतिनिधी
21 ऑगस्ट 2020
( विक्रांत शंके )
कोरोनानंतर देशातही आणि राज्यातही जनजीवन हळुहळु का होईना पुर्वरत होताना दिसत नाहीये. केंद्राने यापुर्वीच अनलॉकची प्रकिया चालवली असुन आता राज्यसरकारने 50 % इतक्या क्षमतेने जिल्ह्याअंतर्गत बससेवा सुरू केली आहे. सतत लॉकडाउन व त्यामुळे जागोजाग अडकलेले लोक या पार्श्वभुमीवर राज्यातील नागरिकांना हा मोठा दिलासा आहे. कालपासुनच लोकांनी कमी प्रमाणात का होईना पुर्वीप्रमाणेच प्रवास करण्यास प्राधान्य दिले आहे. त्यामुळे जागोजागच्या बसस्थानकांवर बैगा सावरत एस टी बसची चौकशी करणारे महिला , पुरूष व सोबतची लहान मुलं हे काहीस दुर्मिळ झालेलं चित्र दिसुन येतंय. यासंदर्भात प्रतिक्रिया घेतल्या असताना , आता वाहतुक सुरू झाल्याने आम्ही आमच्या गावी जावु शकु याचा आम्हांला आनंद आहे अशी भावना प्रवाश्यानी मांडली तर लातूर शहरातील वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनीही एस टी बसचालक व वाहकाना हार घालुन या निर्णयाचं स्वागत केल हे वंचित बहुजन आघाडीच्या डफली बजाव आंदोलनाच यश आहे, आमच्या मागण्या अगदी 7 दिवसाच्या अवधीत मान्य केल्या म्हणुन महाराष्ट्र शासनाचे आम्ही आभार मानतो. राज्यातील प्रवाश्यानी सोशल डिस्टंसिंग पाळुन प्रवास करावा अशी प्रतिक्रिया अमोल बनसोडे अखील महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघ जिल्हाध्यक्ष( VBA ) यांनी महाराष्ट्र जीवनला दिली सोबत वंचित बहुजन आघाडी विधीसल्लागार Adv. रोहित सोमवंशी , प्रशांत सुर्यवंशी,जयंत काकमाची, नितीन गायकवाड आकाश इंगळे, आकाश नवगिरे , सचिन लामतुरे, अजय सुर्ववंशी कार्यकर्ते उपस्थित होते.