तबलिक जमातमध्ये सहभागी विदेशी नागरिक निर्दोष, सरकारने बळीचा बकरा बनवले प्रसारमाध्यमांनीही केला दुष्प्रचार: मुंबई उच्च न्यायालय 

तबलिक जमातमध्ये सहभागी विदेशी नागरिक निर्दोष, सरकारने बळीचा बकरा बनवले


प्रसारमाध्यमांनीही केला दुष्प्रचार:


मुंबई उच्च न्यायालय 



 


मुंबई - प्रतिनिधी 


 


30 एप्रिल रोजी दिल्लीस्थित इस्लाम धर्माचे अभ्यासकेंद्र निजामुद्दीन मरकज येथील तबलिग जमातच्या धार्मिक कार्यक्रमांमुळे कोरोनाच्या रूग्णांची संख्या वाढली. व मुस्लीम धर्मीयांमुळे कोरोना महामारी पसरत आहे. असा अपप्रचार भारतीय प्रसारमाध्यमांद्वारे केला गेला. यासंदर्भात तबलिग जमातच्या लोकांना सरकारने बळीचा बकरा बनवले असुन , प्रसारमाध्यमांनी जाणीवपुर्वक या समुहाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने आपल्या निकालपत्रात नोंदवले आहे. तबलिग जमातच्या धार्मिक मेळाव्याला आलेल्या 7 विदेशी मुस्लिम नागरिकांवर मुदतीनंतरही पारपत्राचे नुतनीकरण न करणे , कोरोना महामारी पसरवण्यास कारणीभुत असल्यासंदर्भात राज्य पोलिसांकरवी आरोपपत्र ठेवण्यात आले होते. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने या खटल्याची सुनावणी करत असताना वरील प्रकारची निरीक्षणे नोंदवली व त्या 7 विदेशी नागरिकांची निर्दोष मुक्तता केली आहे. जस्टीस टी वी नलावले व जस्टीस एम जी सेवलीकर यांच्या बेंचने निकालपत्रात आणखीही काही निरीक्षणे नोंदवली. कोरोनासारख्या महामारीमध्ये आपण इतर देशातील या नागरिकांचा पाहुणचार करायला हवा मात्र आपण त्याना अपमानास्पद वागणुक दिली. त्याचबरोबर सरकार वेगळ्या धर्माचे , वेगळ्या देशाचे म्हणुन कोणत्याही व्यक्तीसोबत असा व्यवहार करू शकत नाही. असा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाने दिला.