Adv. प्रशांत भूषण अवमान प्रकरणातील निकाल बहुसदस्यीय खंडपीठाकडे सोपवावा.लातूर विधीद्यांची राष्ट्रपतीकडे मागणी .
लातूर - प्रतिनिधी
19 ऑगस्ट 2020
( विक्रांत शंके )
भारताच्या उच्च न्यायालयाचे सर्वोच्च न्यायाधीश मा. न्या. शरद बोबडे हे लॉकडाउनमध्ये न्यायालये बंद करून विदेशी मोटारसायकलवर फिरत आहेत. अशा आशयाचे ट्वीट करून देशातील महत्वाचे वकील Adv. प्रशांत भुषण यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. मात्र सर्वोच्च न्यायालयाने प्रशांत भूषण यांना ही टीका न्यायालयाचा अवमान करणारी आहे म्हणुन या प्रकरणात दोषी ठरवले आहे. व त्याना लवकरच शिक्षेस पाठवण्यात येईल. या संपुर्ण घटनाक्रमावर लातूर येथील वकील मंडळाने आक्षेप नोंदवला आहे. मा. सर्वोच्च न्यायालयाने प्रशांत भुषण यांना दोषी ठरवण्याची घाई केली असुन , हा निकाल वकीलांना भिती दाखवणारा अाहे.
यामुळे न्यायव्यवस्थेच्या पावित्र्यावर प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे म्हणून हे प्रकरण बहुसदस्यीय खंडपीठाकडे सोपवावे तोपर्यंत शिक्षेचा निकाल देण्यात येवु नये अशी आग्रही मागणी लातूर विधीद्यांनी मा. राष्ट्रपती यांच्या कडे केली आहे. या संदर्भात आज निवासी जिल्हाधिकारी यांच्या कडे निवेदन देण्यात आले यावेळी अँड उदय गवारे, अँड व्यंकट बेद्रे,अँड धनराज झाडके,अँड महेंद्र इंगळे,अँड बि.ई.कवठेकर, अँड सि.बी.मेटे,अँड प्रदीप पाटील उपस्थित होते या निवेदनावर प्रामुख्याने वकील मंडळाचे अध्यक्ष अँड सी.बी.आगरकर, माजी जिल्हा न्यायाधीश आर. वाय. शेख,महाराष्ट्र बार काँउन्सिलचे माजी उपाध्यक्ष अँड बि. एच.जाधव, अँड मधुकर राजमाने अँड रमेश पाडोळे,अँड शिवकुमार बनसोडे, अँड बालाजी पांचाळ, अँड संजय बस्तापुरे,अँड डि.बी.आराध्ये,अँड प्रशांत काळदाते, अँड एस.टी. उटगे,अँड एस.व्ही.कुलकर्णी आदी विधिज्ञांच्या स्वाक्षर्या आहेत .