पोलिस - दडपशाही विरोधी जनांदोलनाच्या वतीने ठिय्या आंदोलन व DYSP सांगळे यांचा निषेध. 

पोलिस - दडपशाही विरोधी जनांदोलनाच्या वतीने ठिय्या आंदोलन व DYSP सांगळे यांचा निषेध. 



 लातूर - प्रतिनिधी 


17 ऑगस्ट 2020


( विक्रांत शंके )


 साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्ताने अण्णाभाऊंच्या पुतळ्यास अभिवादन करण्यास मज्जाव करणार्या व तसेच याबद्दलचे वृत्त मिळविण्यासाठी आलेल्या पत्रकारांना अरेरावीची भाषा करून गाडीमध्ये बसवुन त्यांची धिंड काढणार्या लातूर शहराचे उपविभागीय आधिकारी (DYSP ) सचिन सांगळे यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत व त्यांना तात्काळ बडतर्फ करण्यात यावे. या मागणीसाठी पोलिस - दडपशाही विरोधी जन आंदोलनाच्या वतीने अण्णाभाऊ साठे चौक येथे ठिय्या आंदोलन व अण्णाभाऊंच्या पुतळ्यास प्रतीकात्मकरित्या पुष्पहार अर्पण करून आंदोलन करण्यात आले. यावेळी उपस्थित सामाजिक व पुरोगामी चळवळीच्या कार्यकर्यांनी सोशल डिस्टंसिंग पाळुन हातात घोषणांचे फलक घेवुन महामानवाच्या अपमानाचा निषेध नोंदवला. तसेच Dysp सचिन सांगळे यांना बडतर्फ करा , पुलिस की दादागिरी नही चलेगी अशा घोषणांनी परिसर दुमदुमुन गेला होता. यावेळी " सामाजिक कार्यकर्ते , पत्रकार यांच्यावरील पोलिसांनी केलेल्या हल्याची चौकशी व्हावी, DYSP सचिन सांगळे यांना तात्काळ बडतर्फ करण्यात यावे . सा. अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याच्या अभिवादनास लॉकडाउनचे कारण देत विरोध केला मात्र भाजप पक्षाच्या आंदोलनाला कोणतीही आडकाठी केली नाही अशी पक्षपाती भुमिका सांगळे यानी बजावली आहे. हे लोकशाहीस घातक आहे.अशी प्रतिक्रिया पोलिस - दडपशाही विरोधी जनआंदोलनाचे प्रवक्ते व रिपब्लिकन सेनेचे प्रा. युवराज धसवाडीकर यांनी महाराष्ट्र जीवनशी बोलताना दिली. यावेळी


अण्णाभाऊ साठे सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष आनंद वैरागे


 शेतकरी कामगार पक्षाचे Adv. उदय गवारे, दै. प्रभातचे पत्रकार रघुनाथ बनसोडे, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष अशोक देडे, मराठा लिब्रेशन टायगर संघटनेचे अधक्ष महेश गुंड, आम आदमी पार्टीचे सांस्कृतिक आघाडी राज्य प्रमुख शाम माने, अखिल महा. कामगार व आघाडी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष अमोल बनसोडे , सुशील सुर्यवंशी, जेष्ठ पत्रकार बाळ होळीकर, , युवकांची सामाजिक चळवळीचे राज्य अध्यक्ष अभय बालाजी भीम आर्मी एकता मिशनचे अक्षय धावारे, बाबा ढगे, राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे लाला सुरवसे .आदी मोठ्या प्रमाणावर पत्रकार बांधव , महिला व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.