महाराष्ट्र जीवन IMPACT मृताच्या नावावर केलेला सातबारा बदलुन दिला , नजरचुकीने हे घडले असल्याचा तहसीलदारांचा दावा

महाराष्ट्र जीवन IMPACT


मृताच्या नावावर केलेला सातबारा बदलुन दिला , नजरचुकीने हे घडले


असल्याचा तहसीलदारांचा दावा



 


रेणापुर - प्रतिनिधी


8 ऑगस्ट 2020


(म.जी. टीम )


 


दि. 3 ऑगस्ट 2020 रोजी रेणापुर तालुक्यातील सिंधगाव येथील महसुल प्रशासनाने एक अजबच कारभार केला होता. सिंधगाव या गावातील शेतकरी बशीर शेरीफोद्दीन शेख ( वय -७०) यांच्या नावे मालकी हक्काची ७/१२ नोंद असलेली गट न २४७/१ मधील १ हेक्टर ६१ आर शेतजमीन आहे. ही जमीन फसवणूक करून हडपण्याच्या उद्देशाने इस्माईल तय्यबसाब शेख ( मृत व्यक्ती ) यांना समोर दाखवून काहीजणांनी दि. 29 /5/2020 रोजी खोट्या व बनावट ,बोगस संमती पत्राद्वारे बशीर शेरीफोद्दीन शेख यांच्या मालकी हक्काची 7/12 नोंद असलेली गट न 247/1 मधील 1.61R पैकी 0.36 R जमीन इस्माईल तय्यबसाब शेख ( मृत व्यक्ती ) यांच्या नावावर करणेबाबत हरकत नसल्याचा मजकूर असलेले संमतीपत्र दि. 29 /5/2020 रोजी बनवले गेले . आता हे संमती पत्र बोगस व बनावट तर आहेच मात्र यासाठी मुद्रांकसुद्धा २०18 वापरला गेला आहे. आता या संमती पत्राची कसलीही कल्पना शेतकरी बशीर शेरीफोद्दीन शेख याना नसून त्या संमती पत्रावरील बशीर शेख यांची स्वाक्षरी खोटी आहे. या बोगस व बेकायदेशीर संमतीपत्राच्या आधारे इस्माईल तय्यबसाब शेख यांच्या नावाने दि. 1/जुन/2020 रोजी मा. तहसीलदार , रेणापूर यांच्याकडे अर्ज करून एकत्रीकरणाच्या कमी झालेले क्षेत्र दुरुस्त करून मिळणेबाबत ची मागणी करण्यात आली. त्यांनतर तहसीलदारच्या आदेशाने दि.2/जुलै /2020 ते 3 /जुलै 2020 च्या दरम्यान बशीर शेरीफोद्दीन शेख यांच्या मालकी हक्काची ७/१२ नोंद असलेली गट न २४७/१ मधील १ हेक्टर ६१ आर पैकी ०. ३६ आर जमीन इस्माईल तय्यबसाब शेख या मृत व्यक्ती व्यक्तीच्या नावावर करण्यात आली. या कामी तो शेतकरी जिवंत आहे का नाही का ?? याबद्दल चौकशी करण्याची कसशीली तसदी सबंधित तलाठी व तहसीलदाराने घेतलेली नव्हती.प्रशासनाच्या या गलथान कारभारामुळे तालुका परिसरात मोठा गहजब उडाला होता. तेव्हा या संदर्भात प्रकरणाची गंभीर दखल घेत महाराष्ट्र जीवनने याची बातमी प्रसिद्ध केली. बातमी प्रसिद्ध होताच रेणापुर तहसीलदारानी आपला निर्णय बदलला व योग्य त्या व्यक्तीच्या नावावर सातबारा केला. महाराष्ट्र जीवनने तहसीलदारांशी फोनवरून संपर्क साधला असता हा प्रकार नजरचुकीने झाला असल्याचा निर्वाळा त्यानी दिला व तशी प्रतिक्रिया कैमेर्यासमोर द्यायची त्यांनी स्पष्टपणे नाकारले. याबाबतीत पिडीताला न्याय मिळाला असल्यामुळे महाराष्ट्र जीवनचे सर्वच स्तरातुन अभिनंदन चालु आहे.