LATUR शहरातील कोरोना रैपीड टेस्ट केंद्रावर सोशल डिस्टंसिंगचा फज्जा : महापौर , जिल्हाधिकारी लक्ष द्या जनतेची मागणी
लातूर - प्रतिनिधी
12 Aug 2020
( विक्रांत शंके )
जिल्हाधिकार्याच्या आदेशानुसार लातूर शहरात दि 13 ऑगस्टपासुन लॉकडाउन शिथील करण्यात आले असुन 17 ऑगस्टपासुन लॉकडाउन पुर्णपणे उठणार आहे. या पार्श्वभुमीवर शहरातील व्यापारी व दुकानदार व्यवसायिक इ. गटांची कोरोनाविषयक रैपिड टेस्ट करणे बंधनकारक केले आहे. यानुसार शहरात 4 -5 ठिकाणी एेन्टीजेन रैपिड टेस्ट केंद्राना सुरूवात केली आहे. यातीलच एक समाजकल्याण कार्यालय परिसरातील ऐन्टीजेन केंद्राला महाराष्ट्र जीवनच्या वतीने भेट देण्यात आली तेव्हा तिथे सोशल डिस्टंसिंगचा पुर्णपणे फज्जा उडाल्याचे दिसुन आले, एकाला एक चिकटुन भल्यामोठ्या रांगेमध्ये थांबलेले नागरिक व त्यांच्या अनेक तक्रारी प्रशासनाच्या अपयशी नियोजनाचा पुरावा होता. याबरोबरच तिथे प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी पोचल्याचे पाहताच पोलिसांची गर्दी हटवण्याची केविलवाणी धडपड या वास्तवाला प्रश्न विचारत होती. याप्रसंगी स्वैबचा रिपोर्ट वेळेवर येत नाही , नागरिकांना रांगेमध्ये शिस्तीत न पाठवता वशिल्यावर पाठवले जाते अश्या प्रकारच्या तक्रारी महाराष्ट्र जीवनसमोर मांडल्या
( Maharashtra Jivan News Network )