लातूरातील८५ पत्रकारांची परिवारासह रँपिड अँटिजेन टेस्ट, सर्वच निगेटिव्ह

लातुरातील ८५ पत्रकारांची परिवारासह रॅपिट अँटीजेन टेस्ट,सर्वच निगेटिव्ह


 


लातूर,दि.१०ः कोरोनाच्या संकटकाळात इतर कोरोना योध्याप्रमाणे पत्रकारही आपला जीव धोक्यात घालून कोरोनासंदर्भातले वार्तांकरण नागरिकांचे प्रबोधन करण्याचे मोलाचे काम करतात,त्यामुळे त्यांचीही चाचणी होणे आवश्यक असल्याने लातूर शहर महानगर पालिका व लातूर जिल्हा मराठी पत्रकार संघाच्यावतीने सोमवारी लातुरातील पत्रकार व त्यांंच्या परिवारातील ८५ सदस्यांची रॅपिट अँटिजेन टेस्ट श्री शिवछत्रपती ग्रंथालयातील सेंटर मंध्ये करण्यात आली.त्यांचे सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले.महापौर विक्रांत गोजमगुंंडे,उपमहापौर चंद्रकांत बिराजदार,आयुक्त देविदास टेकाळे यांनी याकामी सहकार्य केल्याबद्दल जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरसिंह घोणे यांनी  त्याचे आभार मानले आहेत.


लातूर शहरातील कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेवून महापौर विक्रांत गोजमगुंडे,उपमहापौर चंद्रंकांत बिराजदार आणि लातूर जिल्हा मराठी पत्रकार सघाचे अध्यक्ष नरसिंह घोणे यांनी लातूरमधील पत्रकारांची रॅपिट अँटिजेन टेस्ट करण्याचा निर्णय घेतला.त्यानुसार सोमवार,दि.१० ऑगस्ट रेाजी मनपाच्या श्री शिवछत्रपती ग्रंथालयात उभारण्यात आलेल्या चाचणी केंद्रात ,महापौर विक्रांत गोजमगुंडे, उपमहापौर चंद्रकांत बिराजदार, आयुक्त देविदास टेकाळे यांच्या उपस्थितीत ज्येष्ठ पत्रकार जयप्रकाश दगडे, चंद्रकात झेरीकुंठे, संघाचे अध्यक्ष नरसिंह घोणे,महाराष्ट्र पत्रकार संघ जिल्हाध्यक्ष अशोक देडे,रघुनाथ बनसोडे, संगम कोटलवार, तसेच बाळ होळीकर,संजय देशपांडे, महादेव डोंबे,सुजि नाईक, अशेाक हनणते,वामन पाठक,सोमनाथ स्वामी,शिवाजी कांंबळे,दिंगबर तारे,यांच्यासह त्यांच्या परिवारातील ८५ जणांंची टेस्ट घेण्यात आली.या सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने समाधान व्यक्त करण्यात आले.


आजही बरेच नागरिक कोरेाना चाचणीसाठी पुढे येत नाहीत, लोकांत बरेच गैरसमज आहेत.पत्रकार हा समाजाचा महत्वाचा घटक आहे, त्यांची ही टेस्ट घेतल्याने समाजाला दिशा मिळू शकते असे सांगून महापौर विक्रांत गोजमगुंडे यांची या सेंटरमधून या पुढील काळात नागरिकांचीही मोफत चाचणी केली जाणार आहे,त्यांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.


महापालिकेचे आभार व्यक्त करुन,जिल्हा मराठी पत्रकार संघ अध्यक्ष नरसिंह घोणे यांनी केवळ एक मिनिटांच्या चाचणीतून आपल्या मनातील कोरेानाची एक अनामिक भीती नाहीसी होण्यास मदत झाली.उर्वरित पत्रकार आणि समाजानेही या चाचणीचा लाभ घेवून लातूर कोरोनामुक्तीला हातभार लावावा असे आवाहन केले...