म. फुले जनआरोग्य सेवेच्या लाभार्थ्याचे पैसै देण्यास टाळाटाळ : लातूर येथील आयकॉन सुपरस्पैशैलिटी हॉपिस्टलचा प्रताप
लातूर - प्रतिनिधी
11 ऑगस्ट 2020
( विक्रांत शंके )
देशभरामध्ये कोरोना महामारीने थैमान घातलेले असतानासुद्धा काही कसाई प्रवृत्तीच्या डॉक्टरांकडुन रूग्णांच शोषण थांबत नाहीये.पत्नीला दवाखान्यात एडमिट केल्यानंतर 5 लाख रूपयाच बील फाडुन रूग्णालाही वाचवु न शकणार्या व वाढीव बील मागणार्या अल्फा हॉस्पीटलच्या डॉ. वर्मा यांच्यावर रूग्णाच्या नातेवाईकावर संतापुन चाकुहल्ला केल्याची घटना ताजी असतानाच म. फूले जनआरोग्य योजनेमध्ये लाभार्थी असलेल्या रूग्णाचे 24,000 रूपये लाटण्याचा प्रयत्न शहरातील आयकॉन सुपरस्पैशिलिटी हॉस्पीटलकडुन करण्यात आला.याबाबत सविस्तर वृत्त असे की , भातांगळी येथील रूग्ण बळीराम जाधव यांना आयकॉन सुपरल्पेशैलिटी हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले होते, गरजु असल्यामुळे रूग्णाच्या नातेवाईकानी महात्मा फुले जनआरोग्य सेवेचा लाभ घेण्यासाठी अप्लाय केले होते त्याना उपचारापुरते पैसे मंजुरही झाले होते. मात्र मंजुर पैशामधील 24,000 रूपये इतकी रक्कम रूग्णालय प्रशासनाने लाटण्याचा प्रयत्न केला. मंजुर झालेली रक्कम रूग्णाच्या नावावर शासनाकडुन आल्याचेही रूग्णाच्या नातेवाईकास कळविले गेले नाही. त्रयस्थाकडुन ही माहिती मिळताच रूग्णाने आयकॉन हॉस्पीटलशी संपर्क साधुन पैश्याबद्दल विचारणा केली असता पैसे परत करण्यासंदर्भात टाळाटाळ करण्यात आली. रूग्णाच्या नातेवाईकांनी न्यायाच्या अपेक्षेने काही सामाजिक कार्यकर्त्यांशी व महाराष्ट्र जीवनशी संपर्क साधला तेव्हा म . फुले जनआरोग्य सेवेच्या आधिकार्यासमोर रूग्णालय प्रशासनाने संबंधित रक्कम रूग्णाला रिफंड करण्याचे आश्वासन दिले. याबाबत म फुले जनआरोग्य सेवेचे जिल्हा समन्वयक श्रीयुत संभाजी कल्याणे यानी , म. फुले जनआरोग्य योजना जिल्ह्यामध्ये यशस्वीपणाने राबवली जात असुन , ज्या काही तक्रारी येतात त्या किरकोळ स्वरूपाच्या व रूग्णालय प्रशासन आणि रूग्णाच्या योग्य समन्वयाच्या अभावातुन निर्माण होत असतात, त्यामुळे म फुले आरोग्य योजनेबाबत जनजागृतीची गरज आहे. जाधव प्रकरणातही आयकॉन हॉस्पीटलचा रूग्णाचे पैसे लाटण्याचा वगैरे हेतु नव्हता तर बिलाच बायफर्गेशन न झाल्याने आता हॉस्पीटलला 24,000 रूपये रिफंड करावे लागत आहेत. मात्र सर्वसामान्यांनी योजनेबाबत आधिक सतर्क राहुन प्रशासनाला सहकार्य करावे. अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र जीवनशी बोलताना दिली. यावेळी रूग्णाला न्याय मिळावा म्हणुन मराठा लिब्रेशन टायगरचे महेश गुंड, सागर धुमाळ , मुंबई येथील वैद्यकीय सदुपदेशक अभय बालाजी आदीनी प्रयत्न केले.
(Maharashtra Jivan News Network)