स्वातंत्र्यदिनानिमित्त रक्तदान शिबीर : तरूणांनी जागवल्या शहीद जवान प्रकाश कांबळे यांच्या आठवणी
लातूर - प्रतिनिधी
15 Aug 2020
( गालिब बेग )
स्वातंत्र्य लढ्यामध्ये महान क्रांतिकारी सुभाषचंद्र बोसानी हे आवाहनच केल होतं
"तुम मुझे खुन दो - मैं तुम्हें आजादी दुंगा "
आणि आपल्या ह्या स्वातंत्र्यप्राप्तीसाठीही हजारो क्रांतीकारकानी आपलं रक्त सांडल. म्हणजे एकुणच रक्ताच आणि स्वातंत्र्याचं नात , स्वातंत्र्य दिनाचं अस आगळवेगळ व घट्ट नातं आहे. हेच नातं अजुन घट्ट केलंय लातूर शहरातील तरूणांनी. याबाबत सविस्तर वृत्त असे की, भारताच्या 73 व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधुन भीमज्योत युवक मित्रमंडळाच्या वतीने अहिल्याबाई होळकर चौक, मळवटी रोड येथे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. कोरोनाकाळामध्ये वैद्यकीय आणीबाणी लागु झाली असुन रूग्णांना रक्ताचा प्रचंड तुटवडा भासत आहे. या पार्श्वभुमीवर हे रक्तदान शिबीर खुपच दिलासादायक गोष्ट होती. यावेळी शहीद जवान प्रकाश कांबळे यांच्या बलिदानाला समर्पित हे रक्तदान असल्याचा निर्वाळाही शिबीर आयोजकांनी दिला. यावेळी 63 इतक्या संख्येने रक्तदात्यानी रक्तदान केले. ही आजच्या परिस्थितीत विक्रमी बाब आहे. याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे बळीराम दिवेक ( आर्मी मेजर ), प्रा. सत्यवान कांबळे, शैलेश बोइनवाड, सचिन बंडापल्ले, बाबा बनसोडे आयोजक नितीन शिखरे, सुबुद्ध बनसोडे , लखन गायकवाड, सुनील आयवले, विजयकुमार शिखरे, अभिषेक कांबळे, निहाल घोडके आदि मान्यवर उपस्थित होते.