किरकोळ कारणावरून वादावादी तरूणाच्या डोक्यात सळईने व काठीने मारहाण : घुगीसांगवी येथील प्रकार
शिरूर अनंतपाळ - प्रतिनिधी
8 ऑगस्ट 2020
लातूर जिल्ह्यातील मौजे घुगीसांगवी येथे इरफान शेख या तरूणाला काठीने व लोखंडी रॉडने प्रहार करून मारहाण करण्यात आली. याबाबत सविस्तर वृत्त दि 5 ऑगस्ट 2020 च्या रात्री सुमारे 9 च्या सुमारास घरासमोरील करंजीच्या झाडाचे फाटे का तोडले ? अशी विचारणा करत राजु शेख व शमशोद्दीन शेख हे आले व यामध्ये इरफान शेख याच्या डोक्यामध्ये काठीने व नंतर सळईने डोक्यामध्ये प्रहार केले. तसेच इरफानची आई व लहान भावालाही दगडाने मारहाण करण्यात आली. झाल्या प्रकारानंतर 5 ऑगस्टच्या रात्री उशीरापर्यंत संबंधितावर गुन्हे नोंदविण्याची प्रक्रिया चालु होती. मात्र इरफान व त्याच्या नातेवाईकाचा या संपुर्ण प्रक्रियेवर संशय आहे, इरफानच्या म्हणण्यानुसार पोलिसांनी FIR मध्ये चुकीचा उल्लेख करून कथित आरोपी शमशोद्दीन शेख जो की औसा येथे पंचायत समिती मध्ये कर्मचारी आहे. त्याला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच इरफानच्या लहान भावालाही वैद्यकीय तपासणीस पाठविण्यासाठी पोलिसानी तब्बल 2 दिवस इतकी दिरंगाई केली. असे पीडीताच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे, या प्रकरणात पिडीताच्या विनंतीवरून झाल्या प्रकारात हस्तक्षेप करत लातूरस्थित सामाजिक कार्यकर्ते साहेबअली सौदागर यानी संबंधित पोलिस स्टेशनशी संपर्क साधला व पिडीताने FIR नोंदविण्याच्या प्रक्रियेत केलेल्या चुकीबद्दल जे आरोप केले आहेत त्याबद्दल विचारणा केली. व पोलिसांकडुन जर असे वर्तन होत असेल तर पिडीताला न्याय मिळवुन देण्यासाठी योग्य ते सर्व कायदेशीर प्रयत्न करून त्याचा पाठपुरावा मी नक्की करणार असल्याचे सांगितले. कथित आरोपी शमशोद्दीन शेख हा सरकारी कर्मचारी आहे व पैशाच्या बळावर तो आमच्यावर अन्याय करतो तेव्हा आम्हांला त्याच्याविरोधात न्यायाची अपेक्षा आहे. अशी प्रतिक्रिया इरफान शेख व संबंधितानी महाराष्ट्र जीवनशी बोलताना दिली.,