राज्य माहिती आयोगाने शिक्षणाधिकारी यांना ताकीद तर मुख्यध्यापकाला ठोठावला 5000 रूपयाचा दंड
लातूर:- येथिल सिध्देश्वर माध्यमिक विद्यालय बरकत नगर लातूर ही शाळा माझी नगरसेवक राजेंद्र इंद्राळे चालवत होते.या शाळेत दोन आडीच शे विद्यार्थी शिक्षण घेत होते मात्र शाळेतील विद्यार्थी यांना शाळा सोडायचा दाखला इंदिरा माध्यमिक शाळा अंजली नगर लातूर येथून दिला जात होता.
या शाळेत मुस्लिम विद्यार्थांची संख्या मोठी होती शाळा शासणाच्या नियमा प्रमाणे शाळा कारभार चालत नव्हती कर्मचारी शिक्षक अपुरे असल्याने विद्यार्थांचे नुकसान होत होते या सर्व बाबी लक्षात आल्यावर शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील आग्रनी कार्यकर्ते साहेब अली सौदागर यांनी परिसरातील पालकांच्या तक्रारी वरून माहिती अधिकार अंतरगत सदरील शाळेच्या मुख्यध्यापक व शिक्षण अधिकारी यांना माहिती मागितली व वेळोवेळी अनेक तक्रारी केल्या होत्या साहेब अलीनीं शासनाची होणारी शैक्षणिक लुट वाचविण्याचा त्यांचा प्रमाणिक हेतू परंतू संस्था चालक व शिक्षण अधिकारी हे या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न करित असल्याने मग शेवटी त्यांनी नाइलाजाने शाळा बंद केली परंतू माहिती अधिकाराचे प्रकरण अपीलात गेल्यांने राज्य आयोग औरंगाबाद खंडपीठाने याची दखल घेत शाळेच्या मुख्यध्यापकाला 5000 रुपयाचा दंड ठोठावून शिक्षण अधिकारी यांना या प्रकरणी सक्त ताकीद दिली आहे.
साहेबअलीच्या या धाडसी क्रतीचे प्राचार्य डाँ मधूकर मुडें, अँड सुधाकर अरसुडे, डाँ ताहेर शेख, न्यानोबा जरिपटके,महेबुब शेख बाकलीकर,राजेंद्र पाटील,अदिंनी अभिनंदन केले