मराठवाड्याच्या शरद झरेेंची शिवरायांनाशिवरांंयायवरायांना अभिवादन करुन पर्यावरण जागरण सायकल यात्रा

 


 


 



 



मराठवाड्याच्या शरद झरेेंची शिवरायांन अभिवादन करुन पर्यावरण जागरण सायकल यात्रा
लातूर,दि.१९ः होशीयार....पृथ्वी वाचविण्यासाठी आता केवळ ११ वर्षे उरली आहेत.. हे वास्तव मनाला भिडल्याने मराठवाड्याच्या वडगाव ता.निलंगा येथील पर्यावरण प्रेमी शरद झरे हे राज्यातील जनतेला अलर्ट करण्यासाठी छ.शिवाजी राजे भोसले ते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंंतीनिमित्ताने,दि.१९ फेबु्रवारी ते १४ एप्रिल २०२० या कालावधीत रायगड ते अंबोजागाई तालुक्यातील वानटाकळी अशी पाच हजार किलोमीटर अंतराची पर्यावरण,तापमान कमी करणे,पाणी वाचवणे,वृक्षरोपण-संवर्धन,कुर्हाडबंदी जनजागरण सायकल यात्रा निर्धारीत करुन झरे आज रायगड किल्ल्यावर छत्रपतींचे दर्शन घेवून मार्गस्थ झाले आहेत.
स्वीडनमधल्या १५ वर्षीय गे्रटा या बालिकेने पृथ्वीचा अंंत रेाखण्यासाठी सर्वांनी आता पुढे आले पाहिजे अशी हाक दिली असून,जगभरातर्ल्या शास्त्रज्ञानंीही वेळीच जागे होवून पृथ्वीचे वाढते तापमान  रोखण्याचे आवाहन  केल्याने जगभरातले पर्यावरणप्रेमी जागे झाले आहेत.निलंगा तालुक्यातील वडगाव येथील कार्यकर्ते शरद झरे यांनीही यात उडी घेत छ.शिवाजी राजे भोसले जयंती ते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंंती कालावधीत रायगडावर दि.१९ फेबु्रवारी २०२० रोजी छत्रपतींचे दर्शन घेवून,पाच हजार किलोमीटर सायकल फेरीला निघाले आहेत.या फेरीत ते मजल दरमजल करत नागरिक  विशेषतःशालेय मुलांना झपाटल्याने होणारा हवामान बदल, वाढते प्रदुषण,पर्यावरण,वृक्ष लागवड व संगोपण, पाण्याचा काटकसरीने वापर,वृक्षतोड बंदी कायद्याची कडक अमंलबजावणी करणे बाबतच आग्रह धरुन कृतीशिल होण्याविषयी या सायकल यात्रेतून जनजागरण करणार आहेत.
झरे यांची ही सायकल यात्रा रायगड... रत्नागिरी... सिंधुदुर्ग... कोल्हापूर...सांगली...सातारा... सोलापूर... उस्मानाबाद...लातूर... नांदेड... यवतमाळ...वर्धा... अमरावती... अकोला... बुलढाणा... औरंगाबाद... जळगाव...धुळे... नाशिक... ठाणे... मुंबई...पुणे...आ.नगर... बीड... अंबाजोगाई  अशी जावून तिचा समारोप दि.१४ एप्रिल २०२० रोजी आंबेडकर जयंती दिनी अनेक पर्यावरणप्रेमी मान्यवरांच्या उपस्थितीत अंबाजोगाई तालुक्यातील वानटाकळी डोंगर पायथ्याशी करणार आहे,असे शरद झरे यांनी  सांगितले..