लातूर शाहिनबाग- जी महिला शेख फातेमा बनून घरात बसली होती आज ती झांसीची राणी बनून सरकारच्या विरोधात उभी आहे.
लातूर : - सीएए ,एन.आरसी,एन पी आर विरोधी हम भारत के लोग या मंच च्या वतिने लातूर येथिल अण्णाभाऊ साठे चौक येथे 14 फेब्रुवारी पासून दिवसरात्र बेमुदत धरणे आंदोलन चालू आहे.
यात महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात आहे संपूर्ण देशात सीएए,एन आर.सी,एनपीआर,च्या विरोध होत असताना केंद्र सरकार अडेलतटू भूमिका घेऊन नागरिकांचे जीव गेले तरी चालतील ,विद्यार्थांचे डोके फुटले तरी चालतील धर्माधर्मातील,जाती-जातीत फुट पडली तरी चालेल परंतू मंताच्या ध्रुवीकरणासाठी सीएए,एन.आर.सी लागू करूच ,अशी भूमिका घेतल्यामुळे
लातूर शहरातील विविध संघटना व संविधान प्रेमीनीं देशापुढे आव्हाने विद्यार्थामध्ये वाढता असंतोष देशातील अस्थिरता आदी विषयावर व्याख्याने तसेच रात्री काव्य संमेलन, मुशायरा चित्रकला प्रदर्शन,संभाषण,गजल,असे विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करून सरकारचा निषेध नोंदविण्यात येत आहे.