महात्मा ज्योतीराव फुले शिक्षक परिषदेच्या वतीने
भव्य शिक्षण परिषद व पुरस्कार वितरण सोहळा संपन्न
लातूर- दि. २३ फेब्रुवारी २०२० रोजी कै. दगडोजीराव देशमुख सभागृह, लातूर येथे संपन्न झाला. याकार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ब्रिगेडियर सुधिर सावंत, मार्गदर्शक म्हणून जब्बार सगरे सर, प्राचार्य पी. एन. सगर, प्रदेशाध्यक्ष व्यंकटराव जाधव आदी उपस्थित होते.
या सोहळ्यामध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे व आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. ब्रिगेडियर सावंत म्हणाले की, समाजात डॉक्टर, इंजिनिअर, वैज्ञानिक, अधिकारी आणि एक उत्कृष्ट शिक्षक बसवण्याचे काम हे एक आदर्श शिक्षकच करु शकतो. म्हणून त्यांच्या कार्यालयाचा गौरव झालाच पाहिजे असे ते या कार्यक्रम प्रसंगी बोलतांना म्हणाले.
यामध्ये समाजरत्न पुरस्कार डॉ. नारायण चाटे गुरूजी : सचिव नवयुवक तथा चंपावती शिक्षण प्रसारक मंडळ, चापोली, जि. लातूर, नारीरत्न : शर्मिला धनाश्री, मुख्याध्यापिका : कै. बाबुसाहेब पाटील कन्या विद्यालय, वडवळ (ना.), ता. चाकूर, जि. लातूर, सहकाररत्न : युनुस मासुलदार, चेअरमन, चाकूर अर्बन निधी लि., चाकूर, ता. चाकूर, जि. लातूर, शिक्षकरत्न म्हणून सुनिल क्षीरसागर, मुख्याध्यापक, श्री. भोगेश्वर विद्यालय, तळेगाव (भो.), ता. देवणी, जि. लातूर, शिक्षकरत्न शेख परवीन सुलताना मो. शफी- सहा. शिक्षिका, हजरत सुरतशाह उर्दू माध्यमिक विद्यालय, लातूर, शेषेराव बिरादार, मुख्याध्यापक, नवभारत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, खरोसा, ता. औसा, जि. लातूर, सुधीर नाबदे, क्रियाशिल प्राध्यापक श्री व्यंकटेश माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, वलांडी, ता. देवणी, जि. लातूर, प्रा. मुरहरी मोरे, क्रियाशिल प्राध्यापक लाल बहादूर शास्त्री माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, लातूर, माधव काकनाळे, मुख्याध्यापक, सरस्वती माध्यमिक विद्यालय, होनाळी, ता. देवणी, जि. लातूर, शिवप्पा कोरके- क्रियाशिल प्राध्यापक, श्री प्राथमिक विद्यालय, लातूर, नंदकिशोर बिरादार- उत्कृष्ट गणित तज्ज्ञ, श्री व्यंकटेश माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, वलांडी, ता. देवणी, जि. लातूर, फुले मित्र पुरस्कार मजीद जागीरदार, मुख्याध्यापक, मौलाना आझाद मराठी शाळा, उदगीर, जि. लातूर व गणपत गादगे, प्राथमिक शिक्षक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, विराळ, ता. जळकोट, जि. लातूर, नारी सन्मान सुनंदा कुलकर्णी, सहा. शिक्षिका, विमलाताई देशमुख कन्या शाळा, अहमदपूर, शेख परवीन सुलताना- संजय गांधी उर्दू प्राथमिक शाळा, उदगीर, जि. लातूर यांना प्रदान करण्यात आले व इतर ४० शिक्षकांना जिल्हास्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचा प्रस्तावीक जिल्हाध्यक्ष कादीर जागीरदार यांनी केले. यावेळी प्रदेशाध्यक्ष व्यंकटराव जाधव यांनी संघटनेची भुमिका मांडली व ब्रिगेडियर सुधीर सावंत, जब्बार सगरे, पी. एन. सगर यांची समयोचित भाषणे झाली. या कार्यक्राचे यशवंत वाडीकर यांनी सूत्रसंचालन केले व आभार प्रदर्शन प्रा. श्रीकृष्ण दिवे यांनी मानले.