इलेक्ट्रीक तंत्रज्ञानाचा स्विकार काळाची गरज
ना अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते
ओकीनावा शौर्या मोटर्सचा शुभारंभ
लातूर प्रतिनिधी :
आज इंधनाचे वाढते दर शहराचे वाढते प्रदूषण लंक्षात घेता इलेक्ट्रीक तंत्रज्ञानाचा वापर असलेल्या वाहनाचा स्विकार करणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख केले.
इलेक्ट्रीक तंत्रज्ञानावर आधारीत लातूर येथील महेश कावळे यांच्या ओकिनोवा शोर्या इलेक्ट्रिक बाईक (स्कूटर) मोटर्स शोरुमचा शुभारंभ त्यांच्या हस्ते शुक्रवार दिनांक २१ फेब्रुवारी रोजी झाले या प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर राज्यमंत्री संजय बनसोडे, आमदार ज्ञानराज चौगुले, ॲड. व्यंकट बेद्रे, महापौर विक्रांत गोजमगुंडे, संतोष जोशी, पशुवैदकीय अधिकारी बोधनकर, अनिल शिंदे, संजय कावळे, दगडूसाहेब पडीले, अप्पाराव कावळे, परमेश्वर कावळे, शैलेश कावळे, महेश कावळे, पंडीत कावळे, राजपाल भंडे, समद पटेल, मधुसुदन भुतडा, प्रंशात पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख म्हणाले, आज जापनीज तंत्रज्ञान लातूरला येत आहे. या तंत्रज्ञानाचा वापर आम्ही करीत अहोत यावरून लातूर किती पुढे जात आहे हे दिसून येत. या इलेकक्ट्रीक बाईक प्रदुषण विरहीत असुन इंधन खर्चात बचत होणार आहे. लातूरला मॉडेल सिटी करायची आहे. अशा प्रकारच शहर बनविण्यासाठी शहर प्रदूषणविरहित असले पाहिजे. यासाठी इलेक्ट्रीक तंत्रज्ञानाचा वापर असलेल्या वाहनाचा स्विकार करावा लागेल, असे सांगीतले. यावेळी पुढे बोलतांना ते म्हणाले, महाविकास आघाडी म्हणजे पावर टू चेंज झाली आहे. राज्यात जनतेच्या आशीर्वादामुळे महाविकास आघाडीचे सरकार आले आहे. या निमीत्ताने मला दिलेली संधी वाया न घालवता लातूरला अधिकाधिक काय करता येईल याकडे जास्त लक्ष घालावे लागेल. लातूर मनपातील अस्थापनेतील वाहने इलेक्ट्रिक वापरून टप्प्याटप्प्याने का होईना करून या परिवर्तनात लातूर मनपा राज्यात पहिली मनपा हे दाखवून द्यावे असे आवाहन केले. राज्यातील सर्व मंत्र्यांची आस्तापनातील सर्व वाहने इलेक्ट्रिक व्हायला हवीत यासाठी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याशी बोलेन जेणेकरून या धोरणाने प्रदूषण कमी होण्यास मदत होईल. प्रवासत दुचाकी वाहन वापरताना हेल्मेट आवश्यक असून हेल्मेट शिवाय वाहन चालू नये हे बंधन घालायला हवे जेणेकरून अपघात होऊन निष्पाप बळी जाणार नाही असेही त्यांनी आवर्जून सांगीतले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक शैलेश कावळे यांनी केले तर आभार श्रीकीशन कावळे यांनी मानले