लातूरात मुस्लिम मावळ्यांनी केले शिवरायांना अभिवादन
लातूर दर वर्षी पेक्षा या वर्षीची शिवजयंती ही मनाला वेधणारी होती कारण यात मुस्लिम मावळ्यांचा सहभाग हा उल्लेखनीय होता आज छत्रपती शिवाजी महाराज हे कोण्या एका धर्माची मक्तेदारी नसून ते धर्मनिरपेक्ष राजा आहेत हे लातूर सह संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात मुस्लिम मावळ्यांचा शिवजयंती निमित्त शिवरायांना अभिवादन करणे हे सिध्द होते.
आणि भारत भूमिवर रयतेचा जाणता राजा म्हणून अलौकिक किर्ती मिळविणारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावात व कार्यात प्रचंड आत्मविश्वास होता. त्यात साहस,धाडस, सत्य तसेच प्रेरणादायी कार्य सामावलले होते. गत साडे तिनशे वर्ष झाली तरीही त्यांच्या कार्याचा जाज्वल्य इतिहास जीवंत आहे. ते एक राज्यकर्ता राजाचे शक्तीपीठ असून त्यांच्या विचाराचा वारसा सर्वांनी आज जपणे व आचरणात आनणे गरजेचेे व असल्याचे मौलिक विचार महाराष्ट्र जीवन चे संपादक यांच्याशी बोलताना मुस्लिम मावळ्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या
महाराष्ट्र जीवन