राष्ट्रीय सायन्स ऑलिम्पियाड परीक्षेत श्रेया जाधवला गोल्ड मेडल
लातूर
सायन्स ऑलिम्पियाड फाऊंडेशन द्वारा घेण्यात आलेल्या राष्ट्रीय सायन्स ऑलिम्पियाड परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या परिक्षेत गोदावरीदेवी लाहोटी कन्या विद्यालयाची इयत्ता 8 वी वर्गातील श्रेया दिलीप जाधव विद्यार्थिनी चांगले गुण मिळवून उत्तीर्ण झाली असून तीला या परीक्षेत सायन्स ऑलिम्पियाड फौंडेशन तर्फे गोल्ड मेडल मिळाले आहे. तिच्या या यशाबद्दल मुख्याध्यापिका उषा शिंदे, वर्गशिक्षिका ज्योती होळीकर, संगीता कासार, माया माने, अचला कदम, शामल जाधव, बोंडगे मॅडम, विजयकुमार चव्हाण, सुमन चव्हाण, दिलीप जाधव, शिल्पा जाधव, प्रा विनोद चव्हाण, सिंधू चव्हाण आदींनी अभिनंदन केले.
महाराष्ट्र जीवन