ना.दानवे यांच्या शुभहस्ते शिवाजी महाविद्यालयाचा रौप्य महोत्सवी समारंभ

 


 


 


ना.दानवेयांच्या शुभहस्ते शिवाजी महाविद्यालयाचा रौप्य महोत्सवी समारंभ
लातूर 
महाराष्ट्रात गुणवत्तापुर्ण शिक्षण देत गुणवंत विद्यार्थी घडविण्यात भरीव अशी कामगिरी करणार्‍या तसेच रेणापूर सारख्या ग्रामीण भागात सर्वसामान्यांच्या गरीब मुली-मुुलांना प्राथमिक शिक्षणापासून पदवीपर्यंतचे शिक्षण देणार्‍या जे.एस.पी.एम.लातूर या संस्थेच्या अंतर्गत गत 25 वर्षापासून रेणापूर येथे चालणार्‍या शिवाजी महाविद्यालयाचे हे रौप्य महोत्सवी वर्ष असून त्यानिमित्त लातूर जिल्ह्यातील कृषी,ग्रामीण, बँकींग व विविध क्षेत्रातील गुणवंताचा सत्कार  तसेच वाणिज्य शाखा संशोधन केंद्राचे उद्घाटन केंद्रिय अन्‍न व नागरी पुरवठा राज्यमंत्री ना.रावसाहेब दानवे यांच्या शुभहस्ते दि.26 फेबु्रवारी 2020 रोजी दुपारी 3 वा. शिवतीर्थ परिसर, शिवाजी महाविद्यालय, रेणापूर जि.लातूर येथे होणार असल्याची माहिती संस्थेचे कार्यकारी संचालक अजितसिंह पाटील कव्हेकर व  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राजेंद्रप्रसाद अवस्थी यांनी दिली आहे.
या रौप्य महोत्सवी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष लोेकनेते माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर, प्रमुख अतिथी म्हणून माजी मंत्री आ.संभाजी पाटील निलंगेकर, स्वामी रामांनद तीर्थ विद्यापीठाचे कुलगुरू उध्दवजी भोसले, खा.सुधाकरराव श्रृंगारे, माजी खा.डॉ.गोपाळराव पाटील, आ.अभिमन्यु पवार, शिक्षक आ.विक्रम काळे, संस्थेच्या सचिव माजी जि.प.अध्यक्षा सौ.प्रतिभाताई पाटील कव्हेकर आदींची उपस्थिती राहणार आहे.
जे.एस.पी.एम.लातूर संस्थेच्या वतीने गत 35 वर्षापासून गुणवत्तापुर्ण शिक्षण आर्ट, कॉमर्स, सायन्स कॉलेज,पॉलिटेक्निकल कॉलेज, नर्सिंग कॉलेज, सी.बी.एस.ई इंग्लिश स्कुल मध्ये लातूर,औरंगाबाद,पुणे येथून नित्याने दिले जाते. तसेच या शिक्षणाबरोबर हुतात्मा वीर जवान माले यांच्या नावाने व्याख्यानमाला, जागतिक व देश पातळीवरचे विषय घेऊन शिक्षण परिषद, त्याचबरोबर दैनंदिन घटणाक्रमावर निर्माण होणारे प्रश्‍न-समस्या व विविध समाजोपयोगी कार्यक्रम सर्व कॉलेजच्या वतीने घेतले जाते. तसेच या  शिवाजी महाविद्यालयात आर्ट,सायन्स,कॉमर्स हे विभाग गेली पंचवीस वर्षापासून अत्यंत चांगल्या प्रकारे चालविले जाते. या कॉलेजमुळे रेणापूर सारख्या ग्रामीण भागातील मुली व मुलांना शिक्षणाची सोय झाली असून त्यामुळे अनेकांचे आयुष्य बदलले आहे. विज्ञान, अध्यात्म व व्यवसायकतेवर आधारीत शिक्षण तेथे दिले जात असल्यामुळे त्यातून तेजस्वी विद्यार्थी घडविण्याचे कार्य होत आहे. या महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सवी कार्यक्रमास रेणापूर शहर व तालुक्यातील सर्व क्षेत्रातील तमाम जनतेने व महाविद्यालयाच्या आजी-माजी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन संस्थेचे समन्वयक निळकंठराव पवार आदीने केले आहे.