व्यवस्था समजून घेताना भाग 2

 


 


व्यवस्था समजुन घेताना भाग 2
 
काल आपण व्यवस्था समजुन घेत असताना लेखमालेच्या पहिल्या भागात  व्यवस्थेचे दोन अर्थ पाहिले. एक शब्दश: अर्थ व दुसरा मुल्याच्या, प्रवृत्तीच्या अंगानी जाणारा अर्थ . टोळीशाही- राजेशाही- लोकशाही असा शासनप्रणालींचा दीर्घ प्रवास आपण केला. याचे तपशील तुम्हांला मानव जातीचा इतिहास चाळताना मिळतील. तुम्ही ते अवश्य वाचावेत.मी इथ जमेल तसा याचा  आढावा घेण्याचा प्रयत्न करतो.व्यवस्थेचं मुळ कशात आहे ? माणुसच माणसावर अन्याय का करतो ? तर मला याचं मुळ  माणसाच्या अंर्तप्रवृत्तीत आहे असं वाटत . आता प्रवृत्ती म्हणजे काय तर ? आपला मुळ स्वभाव. ग्रीक विचारवंत प्लेटो याला बेसर इंन्स्टिंक्ट असं म्हणतो. प्रवृत्ती सुद्धा दोन प्रकारच्या असतात. चांगल्या आणि वाईट. व्यवस्था निर्माणाच्या मागं या प्रवृत्ती  व
स्व :अस्तित्वाची प्रचंड जाणीव या बाबी कारणीभुत असतात. आता प्रवृत्ती बरोबरच आपल्याला 
 स्व:अस्तित्वाची जाणीव ही संकल्पना सुद्धा समजली पाहिजे. याच उत्तर सोप आहे. आपण मृत्युला का भितो ?? कारण मृत्युनंतर आपलं अस्तित्वच संपुष्टात येणारं असतं. म्हणजे आपलं किंवा आपल्याशी निगडीत प्रत्येक गोष्टीचं अस्तित्व शाबुत रहावं. चिरकाल रहावं अस प्रत्येकाला वाटत. यात काही गैरही किंवा चुकीचं नाही. निसर्गाचीही  याला मान्यता आहे. निसर्ग आपलं अस्तित्व शाबुत रहावं म्हणुन बरीच तजवीज करतो. पण निसर्गाच्या ठायी न्याय आहे. निसर्ग सर्वांना समान लेखतो. दुर्दैवानै माणसाच्या ठायी न्यायाचं तत्व अभावानच आढळत. माणुस आपल्या सोयीने न्यायाची व्याख्या करतो. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे माणुसच या गोष्टींच्या मोठमोठ्या वल्गना करतो आणि याच्या उलट वागतो. पण काही माणस सततच न्यायाच्या बाजुनी असतात टोळीयुगापासुन हेच होत आलेल आहे. टोळीयुगात माणसाची प्रगल्भता तेवढी नव्हत. कदाचित आजसारख्या गुंतागुंतीच्या गोष्टींचा शास्त्रांचा विकास तेव्हा झालेला नव्हता. पण काही बाबी तेव्हापासुन आजतागायत तशाच आहेत. आजही व्यवस्थेला टिकविण्यात त्या मोलाची भुमिका बजावतात. कशा ते पाहु पुढच्या भागात