अंधश्रद्धेचा व्हायरस कधी जाणार ?
संपूर्ण भारत सध्या लाॅकडाऊन झालेला आहे कोरोनामुळे रस्त्यावर कोणीच बाहेर निघत नाही. सर्व जण घरात आहेत ज्या अत्यावश्यक सेवा आहेत तेच लोक घराबाहेर पडताना दिसत आहेत, भारतातले लोक हे मुळात खूप भोळेभाबडे आहेत ते कोणत्याही गोष्टीवर लवकर विश्वास ठेवतात जर भारतीयांना सांगितल की 100 किलोमीटर चालत गेल्यानंतर कोरोना ची लागण आपल्याला होत नाही तर हे लोक लगेच चालायला लागतील , सांगायचा मुद्दा हा आहे की, काल मध्यरात्रीपासून लातूर शहरातील आणी आसपासातील गावांना नीट झोप नाही कारण या भागातील लोक हे एका अफवेने खूप हादरले आहेत त्यांना रात्री झोप नाहीच पण त्यांचे पुण्या, मुंबईला राहणाऱ्या नातेवाईकांना पण झोप नाही
ती अफवा अशी की लातूर च्चा सरकारी रुग्णालयात एक बाळ जन्मल आहे आणी ते बाळ जन्मल्या जन्मल्या ते बाळ बोलत आहे की, जे जागी आहे ते जागीच राहतील , आणी जे झोपले आहेत ते कायमचे झोपतील . या अफवेने शहरातील सगळ्यांची झोप उडवली तसेच लोक हे घराबाहेर येवून थांबले , घोळका करून बोलू लागले, रस्त्यावर फिरू लागले केवळ मूर्ख पणाचा कळस लोक करू लागले लोकांना कोरोना व्हायरस ची भिती नाही त्यांना त्यांच्चा लहानपणीच अंधश्रद्धेच्चा व्हायरस ने घेरल आहे , आज ना ऊद्या कोरोना व्हायरस भारतातून जाईल पण अंधश्रद्धेचा व्हायरस हा इथल्या भारतीयांच्चा नसानसात भिनलेला आहे कोरोनाच्चा अगोदर हा व्हायरस काढण गरजेचा आहे , आज 21 व्या शतकात आपण आहोत पण 21 व्या शतकासारखी बुद्धी मत्ता आपली झाली पण त्या बुध्दी मत्तेला अंधश्रद्धेची कीड लागलेली आहे ते कीड काढण गरजेच आहे. काही दिवसापूर्वी एका हिंदी वृत्तवाहिनीन अस दाखविल होत की, मध्य प्रदेश राज्यातील पिपरिया या गावात एक जुन झाड आहे आणी त्या झाडाला घट्ट मिठी मारली की , कितीही गंभीर आजार असला तरी तो आजार बरा होतो म्हणून त्या झाडाच्या समोर 15/15 किलोमीटर रांगा लागल्या आणी एवढेच नाही तर तिथे गर्दी होत असल्यामुळे पोलिस बंदोबस्त करण्यात आला आणी नागरिकांना झाडाचे दर्शन देण्यात येऊ लागले. आपण 2020 मध्ये आहोत स्वर्गीय . तकालीन राष्टपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच स्वप्न होत मिशन ट्वेण्टी ट्वेण्टी म्हणजेच भारत महासत्ता होईल पण भारतात अंधश्रद्धा सारखा व्हायरस जो पर्यंत आहे तो पर्यंत भारत हा महासत्ता होणार नाही , कारण इथले लोक कितीही शिकले किंवा कितीही मोठ्या पदावर गेले तरी त्यांच्या वाहनांना लिंबू मिर्ची लावणारच, कितीही प्रशस्त , सुंदर , उच्चराहणी मानाच घर असल तरी त्या घरासमोर काळी बाहुली ही लटकावलेली असेलच . म्हणून म्हणतो भारतात कोरोनान आता थैमान घातल आहे , पण अंधश्रद्धेसारखा व्हायरस हा भारतींयाच्चा जन्मापासून त्यांना घेरत आहे . म्हणून या व्हायरस ला भारताबाहेर काढण्यासाठी भारतीयांनी प्रयत्न करायला हवेत.....
...........
✍️आकाश सोनकांबळे ✍️