विवेकाची जागा असावी मेंदुत- प्रवृत्ती सोडाव्या कळु लागताच

 



पब्लिक है भाई पब्लिक है..


विवेकाची जागा असावी मेंदुत- प्रवृत्ती सोडाव्या कळु लागताच


तुम्हीही कोरोना कोरोना, कोरोनाबद्दल ऐकुन वाचुन, पाहुन थकला असाल. थोडेसे घाबरले असाल. याबद्दल काय काय काळजी घ्यावी ? भारतात कोरोनाबाधिताचा आकडा कुठपर्यंत गेला. यातील मृत्युमुखी किती पडले.राज्य सरकार , केंद्र सरकार कोणती  पावलं उचलत आहे.जगभरातील टॉप डॉक्टर्स , आरोग्य संस्था काय सांगत आहेत . कोणत्या सुचना पाळाव्या लागतील.याबबत तुमचं चिंतन सुरु असेल. ही मानवी मनाची  पुर्णपणे वैज्ञानिक आणि विवेकी बाजु झाली. आता आपल्या देशात अविवेकी आणि अतार्तिक असे इतके महाभाग आहेत. आणि अशा अशा पदांवर ते कार्यरत होते. की विचारता सोय नाही. यांची विधान आणि विचार पाहिले तर थक्क व्हायला होतं. म्हणजे काय अजबच. कशाचा कशाला पायपोस नाही. अगदी बुद्धी गहाण ठेवल्यासारखे. यातील पहिल उदाहरण श्री अविनाश धर्माधिकारी. चाणक्य मंडळांचे संचालक आहेत. यानी फेसबुकवरून पोस्ट केली की " हीच योग्य वेळ आहे, pok ताब्यात घेण्याची." असा सल्ला त्यानी भारतीय सैन्याला दिला आहे. म्हणजे देश, जगं कोणत्या निर्णायक परिस्थितीतुन जातंय आणि हे महाशय उंटावरून शेळ्या हाकण्याचं काम करून आपल्या मेंदुत किती मेड इन संघीज शेण भरलेलं आहे . याचे पुरावे देताहेत. विचार करा हा माणुस सनदी आधिकारी म्हणुन भारत सरकारच्या सेवेत होता. आणि चाणक्य मंडळ म्हणुन  भरमसाठ फीस घेवुन कलेक्टर बनवण्याचा कारखानाही हा पुण्यात चालवतो म्हणे. हिंदु , मुस्लिम, भारत, पाकिस्तान इ शब्दांची जपमाळ करून आपला कार्यभाग साधुन घेण्याची ही प्रवृत्ती याने वयाच्या 10 व्या वर्षी म्हणजे कळु लागताच सोडायला हवी होती. पण ही प्रवृत्ती इतक्या लवकर सोडुन विवेक स्वीकारला तर शाखेचा सेवक कसला ?? फेसबुकवर याचीही पोस्ट पडताच . नेटकर्यांनी याला कमेंटीच्या बडग्यानी चांगलाच फेसबुकी चोप दिला. याला,ट्रोल म्हणतात असंही कळालं. या बरोबरच दुसरा एक याच प्रवृत्तीचा नेटकरी श्रीकांत उमरीकर याने दिल्ली येथील शाहीनबागवर चालत असलेल्या आंदोलनाला पुर्णविराम मिळाल्याची बातमी एवढी आनंदाने शेअर केली की जसा एखादा इटालियन कोरोना विषाणुवरील एन्टीडोट निघाल्याची करेल. शाहीनबाग तमाशा पोलिसानी उठवला या मथळ्याखाली याने ही बाब त्याला खुपच दिलासादायक वाटत असल्याचं सांगितलय. फिलींग हैपीच्या टैगसह शेअरपण करत सुटलाय.यालाही फेसबुकी चोप मिळाला. सकाळी न्युजवर पाहिलं तर एक प्रस्थापित व वेलनोन हिंदी बातम्यांच चैनल कोरोनाच्या संकटात पाकिस्तानी मौलाना कसा खुन के आंसु रडतोय हे ओरडु ओरडु सांगत होतं.या सगळ्यांची लिंक कुठे नागपुरच्या हेडक्वार्ट पर्यंत जातेय का नाही ते ज्यानी त्यानी तपासावं. म्हणजे  आमच्याकडे कोरोना येवो वा कोल्हापुरला महापुर आम्ही फक्त भारत पाकिस्तान, मुसलमान हेच करत राहणार. याच हिंदु राष्ट्राच्या वेडापायी यांनी देशाचा GDP पार खाली आणला. आज देश मृत्युच्या दारात उभा असतानाही यांना हीच खेर सुचताहेत. माझ्या कालच्या लेखातील मोदी टीकेवरचा मुद्दा बर्याच जणांना विषयाला सोडुन वाटला. पण अशा संकटावर मात करायची असेल तर प्रचंड सकारात्मक राहत. अशा प्रवृत्तीना ढिल देणं म्हणजे कोरोनापेक्षाही भयंकर आहे असं मला वाटतं. याचीही चिकित्सा  झाली पाहिजे. यावर टीकाही झाली पाहिजे. कारण. भगतसिंग म्हणतात त्याप्रमाणे " स्वतंत्र विचारशक्ति और टीकादृष्टी ये क्रांतिकारी सोच के दो अहेम लक्षण है. अशा प्रवृत्तींना point out करायलाचं हवं
          ©️विक्रांत शंके