लातूरच्या सर्वांगीण विकासासाठी क्रेडाई कटीबध्द :राजीव पारीख

 


 


लातूरच्या सर्वांगीण विकासासाठी क्रेडाई कटीबध्द :राजीव पारी 


लातूर/प्रतिनिधी : बांधकाम व्यवसायाच्या माध्यमातून देशाच्या आर्थिक विकासात महत्वाचे योगदान देणाऱ्या क्रेडाई महाराष्ट्रच्या वतीने राज्यभरात क्रेडाई आपल्या दारी हा उपक्रम सुरू केला.या उपक्रमाचा एक भाग म्हणून जिल्ह्यातील बांधकाम क्षेत्रातील विविध समस्या जाणून घेण्यासाठी संघटनेेचे पदाधिकारी यांची लातुरात ग्रँन्ड हाँटेल येथे प्रेस कॉन्फ्रेंस संपन्न झाली.
या प्रेस कॉन्फ्रेंस मध्ये क्रेडाई महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष राजीव पारीख यांनी लातूर ज्या पध्दतीने  शैक्षणिक,सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात आग्रगण्ये आहे तसेच लातूर ला  सोंदर्य राखण्यासाठी वाँटर हाँसिंग कशा पध्दतीने करता येईल सामान्य व्याक्तीला कमी पैसांन मध्ये चांगले घर कसे देता येईल ते आम्ही पूर्ण प्रयत्न करू असे आश्वासन यावेळी क्रेडाई महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष राजीव पारीख यांनी पत्रकारांशी बोलतांना  दिले.
यावेळी क्रेडाई लातूरचे अध्यक्ष म्हणून धर्मवीर भारती यांनी पत्रकारांशी वार्तालाप करताना म्हणाले लातूरच्या विकासासाठी क्रेडाई महाराष्ट्र राज्य व्यावसायिक संघटना ही 
बांधकाम व्यवसायातून शहराच्या विकासाबरोबरच संबंधित क्षेत्रातील विविध घटकांचे प्रश्न जाणून घेऊ शासनाकडे बांधकामांच्या माध्यमातून कर उपलब्ध करून देला जाईल, बेघरांना हक्कांची घरे मिळवून देण्यासाठी क्रेडाई लातूर कटीबध्द आहे
व  या संघटनेच्या माध्यमातून राज्यातील 60 शहरामध्ये काम चालू आहे.4 हजारहून अधिक सदस्य असलेल्या क्रेडाईच्या माध्यमातून राज्यभरात सुरू असलेल्या संपर्क अभियानाचा एक भाग म्हणून राज्याचे 16 पदाधिकारी लातूर दौऱ्यावर आहेत. यावेळी राज्याचे , सचिव सुनिल कोतवाल, उपाध्यक्ष सुनिल फुरडे, रवि वट्टमवार, दिपक मोदी, विकास लागू, संजय गुगळे,  आदित्य बेडेकर, रसिक चव्हाण, अभिनव साळूंखे,उदय पाटिल,महेश नावंदर,अमोल मुळे आदीं मान्यवरांची पञकार परिषेदेत  उपस्थिती होती.