स्त्रीने स्वावलंबी बनावे -डॉ.आरती संदीकर

 


 


स्त्रीने स्वावलंबी बनावे -डॉ.आरती संदीकर
लातूर- येथील राम गल्ली भागात महिला दिनानिमित्त मैत्री ग्रुप तर्फे खरी कमाई कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर आरती संदीकर या होत्या आपल्या अध्यक्ष भाषणामध्ये बोलताना त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात संस्कृत मधील एका श्लोकाने केली . जननी जन्मभूमुश्च स्वर्गादपि गरीयसी । या श्लोकाचा अर्थ सांगत त्या म्हणाल्या की जुनी आणि भूमी या दोन्ही गोष्टी स्वर्गापेक्षा ही खूप श्रेष्ठ आहेत, अशा म्हणत त्या म्हणाल्या की महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी, ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
दिनांक २८ फेब्रुवारी १९०९ रोजी, न्यूयॉर्क येथे पहिला महिला दिन साजरा करण्यात आला असला तरीही, सन १९१० च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषेदत मांडलेल्या सुचने प्रमाणे, ८ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात येतो. 
तसेच पुढे बोलताना  त्या म्हणाल्या की महिलांच्या आरोग्याबाबत कशी काळजी घ्यावी याचे सुद्धा मार्गदर्शन केले पुढे बोलताना त्या म्हणाल्या की एक स्त्री आपल्या कुटुंबाची काळजी घेते परिवारातील सर्व लोकांना गरम अन्न खायला देते आणि स्वतः शिळे अन्न खाते महिला आपल्या आरोग्याकडे लक्ष देत नाही यामुळे महिलांच्या तब्येती बिघडतात आणि महिलांमध्ये आजाराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत जाते . तिच्या परिवारातील कुठलाही सदस्य आजारी पडला  तर ती काळजी घेते . पण जर  एक स्त्री आजारी पडली तर तिची काळजी कुणी घेत नाही अशा बऱ्याच घटना माझ्या डोळ्यासमोर पाहिला मिळतात.
त्यामुळे महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी घेत प्रत्येक स्त्रीने आपला आत्मविश्वास जागून प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला ने आपले नाव  केले  पाहिजे आपल्या देशात स्त्रीचे खूप महत्त्वाचे स्थान आहे .आपल्या भारत देशाला आपण माता संबोधतो एक स्त्री देवीचे रूप आहे  आदिशक्ती, महाकाली, जगदंबा , दुर्गा  अशा अनेक प्रकारच्या देवी आहेत ज्यांनी की क्रूर प्रवृत्ती असणाऱ्या राक्षसांचा वध केला. आज आपल्या देशात प्रत्येक स्त्रीने वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आपले नाव उंचावलेले आहे राजकारणामध्ये समाज कारणांमध्ये अर्थकारणात शिक्षणात अशा अनेक प्रकारच्या क्षेत्रामध्ये आज महिला पुढे आहेत अशा कितीतरी महिलांचे नाव घेता येतील जिजामाता, राणी लक्ष्मीबाई, प्रतिभाताई पाटील , सिंधुताई सपकाळ ,किरण बेदी असे अध्यक्षस्थानी बोलतांना म्हणाले.
पुढे प्रमुख अतिथि म्हणून सौ.वनिता शैलेश गोजमगुंडे यांनी जागतिक महिला दिनाची माहिती दिली.


 महिलांचा विजयाचा दिवस अमेरिका आणि युरोपसहित जवळजवळ जगभरच्या स्त्रियांना विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत मतदानाचा हक्क नाकारलेला होता. या अन्यायाविरुद्ध स्त्रिया आप आपल्या परीने संघर्ष करीत विजय मिळविला म्हणून ८मार्च १९०८ रोजी अमेरिकेतील स्त्री-कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ, ८मार्च हा 'जागतिक महिला-दिन' म्हणून साजरा केला जातो असे अथिति भाषणात आपले विचार व्यक्त केले.



 तसेच पुढील कार्यक्रमॎात गवळणी ,भारुड ,नाटक,अशा प्रकारचे अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .
 खरी कमाई च्या माध्यमातून महिलांनी वेगवेगळे प्रकारचे स्टॉल लावले होते त्यामध्ये दही धपाटे , पाणीपुरी, भेळ , अशा अनेक प्रकारचे स्टॉल लावले  महिलांनी खरी कमाई  केली आणि त्यांना  खूप मोठ्या प्रमाणात  प्रतिसाद सुद्धा मिळाला  तर स्टॉल लावणाऱ्या महिलांनी मैत्री ग्रुपचे आभार मानले.
तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सौ .दिपा उन्हाळे ,सौ ,हेमा औसेकर, सौ. अश्विनी जोशी ,सौ .संध्या जोशी, सौ. शिल्पा पाठक ,सौ .शिल्पा जोशी ,सौ. मिना खणगे ,सौ .अर्चना तांदळे, सौ. वर्षा प्रयाग, सौ .कल्पना जोशी ,सौ .संगीता चैतन्य ,सौ .संध्या अपसिंगेकर ,सौ .उषा जोशी ,सौ .मनीषा डांगे, सौ .सुनंदा भातलोंढे ,सौ. सुरेखा पाठक ,सौ. सविता कुलकर्णी ,सौ. वंदना सुरवसे ,सौ .अंजली कोराळे ,सरिता देशपांडे, सौ .मनीषा बर्दापूरकर ,सौ. सविता झिंगाडे ,सौ .रेणुका बावस्कर, सौ. शिल्पा नांदगावकर, सौ .आरती कुलकर्णी आदींनी परिश्रम घेतले.