आपला श्वास शाबुत ठेवायचा असेल तर.....
हाच श्वास माणसाला घेण्यासाठी आता भीती वाटत आहे.
हे जरी सत्य असल तरी सध्या चीन मधील वुहान प्रांतातुन सर्व जगात वार्यासारखा पसरलेला.आणी एकमेकांच्या सान्निध्यात आल्याने किंवा हस्तोदलन केल्याने किंवा शिंकणे या पासुन हा व्हायरस पसरत आहे. सध्या भारतात डोके वर करु पाहणार्या कोरोना व्हायरसला आळा घालण्याचा प्रयत्न सरकार तर्फे सर्वोत्परी करण्यात येत आहे. 22 मार्च 2020 ला जो निर्णय मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी घेतला, त्या बद्दल त्यांचे आभार मानयला हवेत.कारण देशाचा प्रथम नागरीक या नात्याने मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी संपूर्ण भारतात कर्फ्यु लावला. जेणे करुन कोरोना व्हायरस पसरणार नाही, आणी जनतेला आव्हाहन केले की अती आवश्यक गोष्टी पुरवणार्या पोलीस डॉक्टर,नर्स, सिक्युरिटी गार्ड तसेच सर्वच क्षेत्रातील जीवनावश्यक वस्तुचा पुरवठा करणार्या सर्व कर्मचारी बंधु व भगीनी साठी ठीक पाच वाजता टाळ्या किंवा धाळ्या वाजवून त्यांच्या कार्याला सलाम द्या. महत्वाच्या अती आवश्यक
गोष्टी जनतेला लागणार आहेत. तेवढ्याच उपलब्ध असतील
त्यात प्रामुख्याने दवाखाने,मेडीकल,बँका,राशन दुकाने व जीवनावश्यक वस्तू असतील. पण महत्त्वाचा मुद्दा हा आहे की जगावर एवढे भयावह संकट का? आले असेल याचा कोणी बारकाईने अभ्यास केला असेल का? किंवा यावर उपाय म्हणून आपली बुद्धी पणाला लावली असेल का? या सर्व गोष्टीवर आळा घालायचा असेल तर सर्वात आधी सोशीयल मिडीया बंद करावी लागेल.कारण का तर कोणी कसा ही गैरवापर करत आहे,पोलीसांनी कडक कारवाई करण्याची ताकीद देऊनही कोणी ऐकत नाही.हे सर्व आपल्या साठीच आहे,जर आपण सुरक्षीत तर आपला देश सुरक्षीत त्यामुळे या वर्षीच्या ह्या रोगाला न लढता हरवू शकतोय.ही लढाई आपण ना शस्त्र घेऊन लढायची आहे ना अस्त्र आत्ता पर्यंतच्या इतिहासात एवढी भयानक जीवीत हानी कधीच झाली नाही. आपण फक्त आज्ञेच पालन करायला हव.तरच आपण या कोरोनाला जगातुन घालवु शकतो अन्यथा नाही. हा पहिला व्हायरस आहे ज्याला आपण घरात बसून हरवु शकतो,जीवन एकदाच आहे परत मिळेल नाही मिळेल तो नंतरचा भाग आहे. पण आहे ते जीवन तरी कुटुंबा समवेत जगा सततची धावपळ सततची तगतग ही तर जीवन भर आहेच की जरा जीवाला आराम द्या
कुटुंबातील व्यक्तीला बोला,हसा खेळा,नाचा जर आवडच असेल तर आवडत्या लेखकांची पुस्तक,कथा,कादंबर्या,गोष्टी वाचा पण घराच्या बाहेर पडू नका . हे स्वतः साठी धोकादायक आहे आणी कुटुंबासाठी सुद्धा," तुम्ही सुरक्षीत तर तुमचे कुटुंब सुरक्षीत अन् तुमचे कुटुंब सुरक्षीत तर आपला भारत देश सुरक्षीत." खर तर या व्हायरसचा परिणाम 2019 च्या शेवटच्या टप्प्यात झाला. म्हणून त्याला COVID 19 अस अधिक्रत नाव देण्यात आले आहे. तब्बल तीन चार महीने सतत चीन,इटली सारख्या महा बलाढ्य देशातील माणसाचे बळी घेणार्या कोरोना व्हायरसला खरच कानडोळा करु नका. आणी महत्वाचे म्हणजे वाँट्सअँप ,फेसबूक,ट्विटर या सारख्या सोशल मिडीयावर तर खरच विश्वास ठेवु नका.हा व्हायरस कोरोना पेक्षा खतरनाक आहे.
शेवटी एवढच म्हणेन की तुम्ही मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या आदेशाच पालन करा .मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांच्या आदेशाच पालन करा . त्यांना सहकार्य करा व या लढाईत विजय आपलाच आहे हा विश्वास ठेवा . आपण सहकार्य कराल अशी अपेक्षा करतो.....
नाही तर शेवटी म्हणाव लागेल बनीम गेली जळुन पेंडी धरुन काय फायदा....
दिलीप सोनकांबळे
लातुर