गोलाईतील फळे मिळणार आता बसस्थानकात
लातूर :- प्रतिनिधी
21 दिवसाच्या लॉकडाउनच्या दिवसात वैद्यकीय सेवा बरोबरच दुध , फळे व भाजीपाला इ सेवा सुरू राहतील असा राज्यसरकारचा आदेश आला. तेव्हा नागरिकानी सुरक्षित अंतरावरून या वस्तु खरेदी कराव्यात यासाठी व गर्दी टाळता यावी या उद्देशाने लातूर शहर महानगर पालिकेच्या वतीने शहरातील मध्यवर्ती बसस्थानकात फळविक्रेत्याना 3 - 4 फुट अंतराने जागा निश्चित करून दिली आहे.याने गर्दी टाळुन नागरिकांनी रांगेत व शिस्तीत फळे खरेदी करून सहकार्य करण्याचे आवाहनही लातूर महानगर पालिकेने केले. .