कोरोना हरतोय - देश जिंकतोय

 


 


कोरोना हरतोय - देश जिंकतोय


 जगभरामध्ये कोरोनाने थैमान घातलेले असताना आणि अमेरिका, इटली, स्पेन, चीनसारख्या महाबलाढ्य देशानी या भयंकर रोगापुढे हात टेकलेले असताना मात्र भारतातील कोरोना संसर्ग झालेल्या रूग्णाची या रोगातुन बरी होण्याची संख्या पाहता. हेच म्हणावे लागेल की कोरोना हरतोय देश जिंकतोय. शास्त्रज्ञांनी कोरोना साथीचे महामारीचे 4 टप्प्यामध्ये वर्गीकरण केलेले आहे. आता यापुर्वीचे दोन टप्पे या रोगाने भारतात पार केले आहेत . आता राहिलाय तिसरा  टप्पा  कम्युनिटी ट्रान्समिशन. म्हणजे लोकांना मोठ्या प्रमाणात होणारी लागण. सुदैवाने या टप्प्यावर भारत पोचु नये अस वाटतय. योग्य काळजी घेतली तर या टप्प्यावरही भारत पोचणार नाही केंद्र सरकारानी वेळेवर योग्य ती पावले उचलले नाहीत. परदेशी लोकांना प्रवेश द्यायला नको होता. याच रडगाण गात बसुन काही फायदा नाही.आता जे झाल ते झालं. याच पार्श्वभुमीवर केंद्र सरकारने   21 दिवसांचा केलेला Lock down, बंद केलेली  रेल्वे  व विमान वाहतुक, राज्य सरकारने लागु केलेले कलम 144 , वेगवेगळ्या जिल्ह्यातील सीमाबंदी , पोलिसांचा वावर, नागरिकांची जागरूकता, मीडिया, सेलिब्रिटी इ  कडुन सतत होणारे सोशल डिस्टसिंगचे आवाहन,कोरोना पिडीताच्या उपचारासाठी  उद्योगपतीनी शासनाला  दिलेले  मोठमोठ्या रकमेचे चेक. हे सगळ एकसलग अस चित्र सिंकवाईज पाहिल तर तुम्हांला हे जाणुन आश्चर्य होइल की खरच कोरोना हरतोय. देश जिंकतोय. कारण कोणत्याही मानवनिर्मित , नैसर्गिक आपत्तींना,परकीय आक्रमणांना भारतीय माणसाने जिद्दीने आणि शौर्याने तोंड दिले आहे. ज्या ज्या वेळी या देशावर संकटे आली त्या त्या वेळी प्रत्येक भारतीय दाराची खिंड बनुन त्या संकटाला पळवुन लावण्यात आलेल आहे. महाभारतामध्ये