कौतुकास्पद! माधुरी कानिटकर यांची लेफ्टनंट जनरलपदी निवड


 


कौतुकास्पद! माधुरी कानिटकर यांची लेफ्टनंट जनरलपदी निवड


पुण्यातील लष्कराच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या माजी अधिष्ठाता मेजर जनरल माधुरी कानिटकर यांची लेफ्टनंट जनरल या पदावर निवड झाली.
पुणे : पुण्यातील लष्कराच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या माजी अधिष्ठाता मेजर जनरल माधुरी कानिटकर यांची लेफ्टनंट जनरल या पदावर निवड झाली. अनेक महिन्यांपासून या पदावर त्यांच्या नावाची चर्चा होती. शनिवारी संरक्षण मंत्रालयातर्फे त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. त्या पदावर निवड झालेल्या महाराष्ट्रातील त्या पहिल्या तर देशातील तिसऱ्या महिला अधिकारी ठरल्या आहेत. त्या डेप्युटी चीफ इंटीग्रेटेड डिफेन्स सर्व्हिसेस मेडिकलच्या प्रमुख म्हणून काम सांभाळतील.
माधुरी कानिटकर पुण्यातील लष्करी महाविद्यालयाच्या पहिल्या महिला अधिष्ठाता होत्या. सध्या त्या उधमपूरच्या युद्ध चिकित्सा विभागाच्या प्रमुख आहेत. शनिवारी लष्करी वैद्यकीय सेवेचे महासंचालक लेफ्टनंट जनरल अनुप बॅनर्जी, तसेच त्यांचे पती माजी लेफ्टनंट जनरल राजीव कानिटकर यांच्या हस्ते त्यांना लेफ्टनंट जनरल पदाची रँक बहाल करण्यात आली.