व्यवस्था समजुन घेतानाच ..
मी म्हणतो आता कोरोनाच जरा राहुद्या बाजुला. तसंपण मिडियाने बराच निगेटिव्ह माहोल करून ठेवलाय. तरीपण काळजी घेवुया. आता आपण एका नव्या विषयाकडं वळतोय आजपासुन. तुम्हांलाही नक्कीच आवडेल याबद्दल वाचायला.खरतर हाच विषय मी 1 ,2,3 भागात जमेल तस गरजेप्रमाणी तुमच्यापर्यंत घेवुन येतोच. त्याआधी याचा आरंभ तरी आपण करूयात. मी या लेखाचं शीर्षक दिलय व्यवस्था समजुन घेताना. तुम्हांला प्रश्न पडला असेल ही व्यवस्था म्हणजे काय ? व्यवस्थेचे दोन अर्थ होतात. शब्दकोशानुसार व्यवस्था म्हणजे ठीकपणे सुरळीत काम चालाव यासाठी केलेली क्रिया वा सोय . जसे की ,पाहुणे घरी आल्यावर आपण त्यांच्या राहण्याची गेस्टरूममध्ये व्यवस्था लावतो. ही एक व्यवस्था झाली. शिस्त. आता दुसरी एक व्यवस्था असते. तिचा मात्र शब्दशः अर्थ घेता येत नाही.ती संदर्भाच्या, मुल्यांच्या, प्रवृत्तीच्या अंगानी तपासत जावी लागते. ती व्यवस्था म्हणजे System.उदा जातीव्यवस्था, धर्मव्यवस्था, संदर्भाच्या अंगानी, गोरे लोकच हे जगण्याच्या लायकीचे आहेत व काळे लोक काम करण्याच्या लायकीचे (वर्णद्वेष ), पांढरा रंग शुभ, संस्कृतप्रचुर मराठी शुद्ध, हे मुल्यांच्या अंगानी व शेवटी मी पोलिस आधिकारी आहे,तुला अरेतुरेच बोलणार, मी प्रिसिंपल, मी मोठा भाऊ आहे, मी बहीण, इथपासुन मी बाप आहे. इथपर्यंत (Hegimany)हे प्रवृतींच्या संदर्भात.म्हणजे वरच्या अधोरेखीत केलेल्या गोष्टींच्या कक्षेत जी बाब येते ती व्यवस्था होय.या व्यवस्था निर्माण कुठुन झाल्या, याना समजुन घेण एका निरोगी समाजासाठी का आवश्यक आहे ? याकडे आपण जावुया. यासाठी थोडंस इतिहासातही जावं लागल तर हरकत नसावी. माणसाच्या प्रजातीचा जन्म 20 लाख वर्षापुर्वीचा. आधी आपण वेगवेगळ्या मजेशीर अवस्थेत होतो. त्यावरून आपली शास्त्रीय नावही पडलीत. निऐंडरथल, क्रोमोनॉन, आणि प्रगत मानव म्हणुन आताचा होमो सेपियन ..इथपर्यंतच्या प्रवासात आपल्या बुद्धीचा विकास झाला . आणि प्रगल्भतेच्या एका टप्प्यावर आपण संघटित समाज निर्माण केला व त्या समाजाच्या श्वाश्वत विकासासाठी या व्यवस्था निर्माण केल्या. उदा. पहिल्यांदा आपण टोळी अवस्थेत होतो, त्यात एक टोळीचा प्रमुख असायचा तो टोळीचं रक्षण करायचा मग आपण थोडं आणखी पुढ आलो टोळीयुग जावुन राजेशाहींच युग आलं. एका राजाच्या हातात निरकुंश सत्ता. इथ बरीच मोठी मानवी मुल्यांची पीछेहाट झाली मग राजेशाही जावुन लोकशाही आली. आज आपण लोकशाहीच्या टप्प्यात आहोत .या टोळी ते लोकशाही शासनप्रणालींच्या दीर्घ टप्प्याच्या प्रवासात अखेर आपण इथ आलो व यातुनच एक व्यवस्था निर्माण झाली. तीच व्यवस्था आपल्याला समजुन घ्यायची आहे. ती व्यवस्था आहे. शोषणाची, दमनाची, मानवी मुल्यांना ठोकरणारी. आता ही व्यवस्था किती अंगानी समजावुन घेता येते ते पुढील भागात पाहुयात.
©️विक्रांत शंके
लेखक महाराष्ट्र जीवन लाईव्ह न्युज समुहात वृत्तनिवेदक पदावर कार्यरत आहे.