सामाजिक कार्यकर्ते डॉ ताहेर शेख याना पोलिस निरीक्षक तिडके यांच्याकडून मारहाण


 


 


सामाजिक कार्यकर्ते डॉ ताहेर शेख यांना पोलिस निरीक्षक तिडके यांच्याकडून मारहाण


लातूर - प्रतिनिधी


सध्या देशामध्ये कोरोनासारख्या महामारीच संकट घोंघावत आहे . या संकटकाळात  काही  पोलिसांना मात्र त्यांच्या कर्तव्याची जाणीव राहिलेली नाही.अस दिसतय . वैचारिक मतभेदाना ते पुर्वग्रहातुन व विशिष्ट धर्माच्या द्वेषातुन पाहत आहेत.व  देशात कायद्याचं राज्य असताना कायदा हातात घेत आहेत. याबद्दल सविस्तर व्रत असे की , शहरातील सामाजिक कार्यकर्ते व पेशाने डॉक्टर असणारे डॉ. ताहेर शेख यांनी मरकज बद्दल राज ठाकरे यांनी जी भडकावु विधान केली त्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा म्हणुन निरीक्षक  विवेकानंद पोलिस स्टेशन, उपविभागिय पोलीस आधिकारी, पोलिस अधीक्षक यांना लॉकडाउनमुळे वॉट्सपवरून ऑनलाइन तक्रार दाखल केली. पण यावर योग्य ती कार्यवाही करण्याऐवजी विवेकानंद पोलिस चौकीचे निरीक्षक तिडके यानी दि. 7 एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास डॉ शेख याना आधिक माहिती जाणुन घेण्यासाठी बोलावुन घेतले. व कार्यालयात घेवुन त्यांना " काय बे ?? तु राज ठाकरे यांच्यावर केस करणार ? कोण आहेत ते माहित आहेत का तुला ??" अशी विचारणा करत काठीने व पट्ट्याने बेदम मारहाण केली.  घटनेचा नक्कीच मानवतेला व कायद्याचं राज्य या संकल्पनेला काळीमा फासणारी आहे