मला कोरोना झालाय म्हणत -विवेकानंद पोलिस चौकीत तोडफोड
लातूर - प्रतिनिधी
शहरातील विवेकानंद पोलिस चौकीत आज सकाळी 6 वाजेच्या सुमारास मोठा अनुचित प्रकार घडुन आला. विवेकानंद पोलिस चौकीमध्ये एका मनोरूग्ण व्यक्तने घुसुन चौकीतील कंप्यूटर , केबिन काच आदी सामानाची तोडफोड केली. किमान एक तास या व्यक्तीचा चौकीमध्ये गोंधळ चालु होता.व पोलिस स्टेशन येण्या अगोदरच दोन व्यक्तिचे डोके फोडले होते.याबाबत सविस्तर माहिती अशी की, मला कोरोना झालाय अशी ओरड करत हा व्यक्ती चौकीमध्ये घुसला, त्या ठिकाणी पी एस ओ झोपलेले असताना त्यांच्या अंगावर मला कोरोणा झालाय म्हणून थुकू लागला.हे ऐकताच कोरोना संसर्गाच्या भीतीने API तरूणे व इतर पोलिस कर्मचारी धावत बाहेर आले. काही पोलिसांनी त्याच्यावर निर्जंतुकीरणाचा फवारा मारण्याचा प्रयत्न केला तेव्हा तो फवारा हिसकावुन घेवून त्याने जमिनीवर आपटला. आतमध्ये उडी मारून कार्यालयातील लैपटॉप, टेबल आदीची जबर तोडफोड केली. या प्रकाराने गोंधळुन गेलेल्या पोलिसांनी हा मनोरूग्ण आहे हे लक्षात येताच. त्याला आवरून शहरातील जिल्हा शासकीय सर्वोपचार रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. कौटुंबिक अडचणीमुळे तो मानसिक रूग्ण झाला असुन त्याच्या पश्चात 12 वर्षाचा लहान मुलगा आहे. अशी माहिती मिळाली.