नरेंद्र मोदी व नरेंद्र मोदी व रामनाथ कोविंद यांनी बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्ताने वाहिली भावपुर्ण श्रद्धांजली- समाजमाध्यमात संताप
आज संपूर्ण देशामध्ये भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार , विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी केली जात असताना व देशवासीय एकमेकांना जयंती दिवसानिमित्त शुभेच्छा देत असताना व या महामानवाच्या कार्यप्रतिमेस त्यांच्या कर्तृत्वास विनम्रपणानी अभिवादन करत असताना मात्र भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व राष्ट्रीपती रामनाथ कोविंद यांनी बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्ताने त्यांच्या ऑफिशियल ट्विटर अकाउंटवरून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. याचे स्क्रीनशाँट व्हायरल होताच.समाजमाध्यमातुन संताप व्यक्त होत आहे. आता ही खुपच मोठी घोडचुक आहे , यांच स्पष्टीकरण भारताचे राष्ट्रपती व पंतप्रधान कसे व कोणत्या तोंडानी देतील हे पाहण्याची गोष्ट ठरेल . देशाच्या सर्वोच्च स्थानावर विराजमान असलेल्या व संवैधानिक पदे भुषवणार्या या लोकांना जयंती व पुण्यतिथी यातील किमान फरक ओळखता न येण्याजोगी अक्कल राहु नये. हे खरच भयावह आहे. आता ही प्रत्यक्ष मोदी व कोविंद यांची चुक आहे की त्यांचे सोशल मिडिया अकाउंट Handle करणार्या टीमची. हे लवकरच स्पष्ट होईल. पण बाबासाहेबांच्या जयंतीदिनी त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा नतद्रष्टपणा केल्याबद्दल समाजातुन तीव्र संताप व्यक्त होत आहे.