भारतीय संस्कृतीमध्ये दिवा हा प्रकाश व ज्ञानाचे प्रतीक आहे. मात्र मोदी या दिव्याचा वापर जनतेला अज्ञानात ठेवण्यासाठी करीत आहेत...!

 



टिळक भोस🖋


(संभाजी ब्रिगेड)
श्रीगोंदा/अहमदनगर 
9422366000


मोदी आणि दिवा थेअरी 
दिव्या खाली अंधार !


भारतासारख्या सव्वाशे कोटी पेक्षा ही जास्त लोकसंख्या असलेल्या देशात कोरोनाचे महा भयंकर संकट कोसळले असताना त्यावर प्रभावी उपाय योजना करण्यापेक्षा थाळी-टाळी वाजवा, असे गैरलागू प्रयोग प्रधान चौकीदार मोदीजी सांगत आहेत. 


कदाचित आपल्याला या गोष्टी फालतू वाटतील मात्र मोदींना या गोष्टींचा प्रचंड मोठा फायदा होत असतो. त्याचं कारण मागील पाच वर्षांत मोदी सरकारने घेतलेले निर्णयांची प्रभावीपणे अमंलबजावणी न झाल्याने
अच्छे दिन , रोजगार, महागाई, नोटबंदी सारखे अनेक विषय अपयशी झाल्याने 
२०१९ लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदींनी भाजप व संघ परिवार यांच्या मदतीने देशभक्तीची लाट निर्माण केली, ती करण्यासाठी देशात तिरंगा यात्रा सारखा इव्हेंट केला, तद्नंतर पुलवामा हल्यानंतर देशात देशभक्तीची लाट तयार करून पाकिस्तान ची भीती दाखवून  दुबळ्या विरोधी पक्षांना नमवून परत देशाची सर्व सूत्र ताब्यात घेतली.


आता मोदीजी पुन्हा आपल्याला भ्रमात टाकत आहेत. देशात कुणाचीच मागणी नसताना रामायण महाभारत सारख्या धार्मिक मालिका दाखवून भक्ती लाट निर्माण करणे, व त्यातुनच भ्रम निर्माण करणे हा उद्देश आहे 


कोरोना आजारापुढे अमेरिका इटली सारखी प्रगत राष्ट्र हतबल झाली आहेत .त्या तुलनेत भारताकडे कसल्याच साधन सुविधा उपलब्ध नाहीत. देशात कोरोना चाचणी करतील अशा लॅब तयार नाहीत. 
डॉक्टरंचे संरक्षण होईल, अशा सुविधा नसताना आपण थाळ्या वाजवल्या, आणि आता दिवे लावायचे सल्ले देत आहेत.


मोदीजी ! कॉरोनाचा धोका जागतिक आरोग्य संघटनेने सांगितला असताना व Raw सारखी सक्षम गुप्तहेर संघटना हाती असताना सुद्धा आपल्याला या धोक्याचा साधा मागमुस सुद्धा लागू नये , ही शोकांतिका वाटते .
 देशात तब्बल पंधरा लाख लोक विमान प्रवास करून भारतात येत होते , त्यांच्या कोणत्याही टेस्ट आपण घेतल्या नाहीत. आणि आता मुंबई पुण्याच्या लोकांच्या हातावर शिक्के मारायला लावत आहात.


कोरोना परकीय देशातून संक्रमित झालेला आजार असून , त्यासाठी सर्व परदेशातून आलेल्या भारतीय प्रवाशांचे कवॉरनटाईन करण्याऐवजी आपण खुशाल थाळ्या वाजवायचा सल्ला देत आहात.


मोदीजी आपले स्वतःचे राजकीय अपयश झाकण्यासाठी मुस्लिम समाजावर चिखलफेक करण्याचा खूप जुना मार्ग आपण निवडला आहे.
पण आपली ही खेळी आता देशात यशस्वी होणार नाही.


कोरोना वरील उपचारासाठी काटेकोर कॉरोंटाईन व सोशल डिस्टन्स पाळण्यासाठी सूचना करूनही बेळगाव कर्नाटक मध्ये भाजप मुख्यमंत्री लग्न सोहळ्यास हजेरी लावत होते,
हे दुर्दैव आहे .


दिल्ली मधून लाखोंचे लोंढे उत्तर प्रदेश बिहारकडे चालत निघाले आहेत . अन्न - पाण्या वाचून लोक तडफडत आहेत. प्रत्येक गाव खेड्यात व मोठ्या शहरांत लाखो लोक अजून अडकून पडले आहेत. त्यांस पुरेसे अन्न उपलब्ध नाहीत.असे असताना आपण जनतेच्या डोळ्यात धूळफेक करून 
दिवे मेणबत्त्या लावण्याचे फालतू सल्ले देत आहात.
तूमच्या या दिव्यांनी तुमच्याच भक्तांच्या अज्ञानी डोक्यात थोडा फार जरी उजेड पडला तरी बेहत्तर,


तुमचा सल्ला फक्त भक्त आणि बिनडोक व मूर्ख लोक ऐकतील , या देशातील सुज्ञ व विवेकी माणूस आपला सल्ला धूडकवल्याशिवाय  राहणार नाही.


बुद्ध सांगतात 
अत्त दीप भव: 
(स्वयं प्रकाशित व्हा)


संत श्रेष्ठ नामदेव महाराज सांगतात, नाचू कीर्तनाचे रंगी 
ज्ञानदीप लावू जगी 


हा ज्ञानाचा दिवा आमच्या घरी अगोदरच पोहचला आहे .


जगद्गुरू तुकोबा ,शिवराय, शाहू फुले ,आंबेडकर, टिपू सुलतान, गाडगेबाबा यांच्या विचारांचे आम्ही अनुयायी आहोत.


तुमच्या नादी लागून दिवा लावणार नाही .कारण तुमच्या दिव्या खाली संघ विचारांचा मनुवादी अंधार आम्हाला चांगलाच ठाऊक आहे.