!!डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत आणि वर्तमान वास्तविकता!!
“ भिम माझ्यासाठी सांगू काय,
भिम धरती भिम आभाय ,
माझे मस्तक नि त्याचे पाय ,
भीम बाप माझा ,माझी माय "
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म इ.स. १४ एप्रिल १८९१ साली मध्य प्रदेशातील इंदूर जिल्ह्यामधील महू या लष्करी छावणी असलेल्या गावात झाला. त्यांचे नाव 'भिवा' असे ठेवण्यात आले, तसेच भीम, भीमा व भीमराव नावानेही कुटुंबिय व शेजारी लोक त्यांना हाक मारत. भीमराव आई-वडिलांचे १४वे अपत्य होते. त्यांचेकुटुंब त्याकाळी अस्पृश्य गणल्यागेलेल्या महार जातीचेआणिमूळचे महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातअसलेल्या आंबडवे गावचेहोते. सुभेदार रामजींनी इ.स. १८९६ च्या नोव्हेंबर महिन्यात सातारा येथील ‘कॅम्प स्कूल’ मध्ये भीमरावाचे नाव दाखल केले. इ.स. १९०७ साली तरूण भीमरावांनी मुंबई विद्यापीठाची मॅट्रिकची परीक्षा यशस्वीरीत्या पास केली. त्यावेळी एखाद्या अस्पृश्य मुलाने असे यश मिळविणे एवढे दुर्मिळ होते की, त्यांचे अभिनंदन करण्यासाठी तेव्हा एक जाहिर सभा भरवण्यात आली. इ.स. १९०८ मध्ये मुंबई विद्यापीठाच्या एलफिन्स्टन महाविद्यालयात प्रवेश घेतला बरोडा नरेशांकडून प्रति महिने २५ रूपये शिष्यवृत्ती घेऊन, अमेरीकेला कोलंबिया विद्यापीठात उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रयाण केले.व खऱ्या अर्थाने इथूनच भारताच्या जडणघडणीची सुरुवात झाली होती,आणि काही वर्षांमध्येच ते प्रत्यक्षात आणण्याचे कार्य बाबासाहेबांनी आपल्या बुद्धीच्या जोरावर केलेले आपणास दिसून येते, आणि एक नवीन भारताची पहाट त्यांनी लिहलेल्या राज्यघटनेच्या माध्यमातून दिसून आली.आणि भारत देशातील प्रत्येक व्यक्तीला त्यांनी आपल्या हक्कावर जगण्याची मुभा दिली कारण की त्यांच्या स्वप्नातील भारत हा वैभवशाली, दैदीप्यमान, बनू शकेल,परंतू आजकाल भारतामध्ये धर्माधता वाढत चालली आहे.मुळात भारत धर्मनिरपेक्ष देश असतांना असं होत आहे.आणि त्यांचेच जर शासन असेल तर त्यांना आवरणे खुपच कठिण बनुन जाते.त्यांना वाटते “संय्या भये कोतवाल अब डर काहे का” ..! म्हणुन जे मनात येईल ते करतांना ते दिसत आहेत.आणि राष्ट्रवादांचा तर अक्षरश सुळसुळाटच यांनी मांडला आहे.”हम कहे वो देशभक्ती” प्रमाणे यांच वर्तन दिसत आहे.याच्याकडे बघुन वाटते की “राष्ट्रद्रोही आज राष्ट्रवादी बनले..!’भारत हा कोणामुळे भारत आहे तर तो संविधानामुळे आहे.या भारताचा ‘पाकिस्तान’ झाला नाही याचं श्रेय बाबासाहेबांना जाते.मग पुन्हा आज ‘हिंदुचा पाकिस्तान’ निर्माण करत आहेत का? भारत आणि पाकिस्तान दोन्ही एकासोबत स्वतंत्र्य झाले.पण आज पाकिस्तानची स्थिती काय आहे? धर्माचा पुर्ण थैमान आहे.कोणताही देश हा धर्मावर कधीच उभा राहु शकत नाही नाहीतर त्याचा ‘पाकिस्तान’ झाल्याशिवाय राहणार नाही.तो उभा राहतो लोकांच्या मुलभुत हक्कावर त्याच्या कल्याणावर .डॉ.बाबासाहेबांनी एक वाक्य खुपच जबरदस्त आहे आणि आजही ते आधुनिक आहे.’ माणुस धर्माकरीता नाही तर धर्म हा माणसाकरीता आहे.’कोणताही धर्म माणसापेक्षा श्रेष्ठ नाही.कारण तो ‘माणसाने माणसाठी’ निर्माण केला असतो.मुळात घटनेमुळेच पक्ष, शासन बनते पण पक्ष घटना मानतात का? डॉ.बाबासाहेबानी 25 नोव्हेंबर 1949 ला इशारा दिला होता की “येथले लोक पक्षाच्या मतप्रणालीला मोठे मानतील की देशाला? जर ते देशापेक्षा पक्षाच्या मतप्रणालीला मोठे मानतील तर आपलं स्वातंत्र्य पुन्हा धोक्यात येईल आणि कदाचित ते कायमचं नष्ट होईल.!”हा भयसुचक संदेशाकडे आपण आज दुर्लक्ष करत चाललो आहोत असं वाटते आणि याविषयी लोकांनी विचार नाही केला तर याचे परिणाम भयंकर होतील.असे म्हणतात की “भुल दिल्याशिवाय ऑपरेशन करता येत नाही आणि दिशाभुल केल्याशिवाय राजकारण करता येत नाही” हे काही खोटं नाही.भारतामध्ये हे होतांना दिसत आहे.जनतेची निव्वड दिशाभुल आज सरकार करत आहे ते कोणाचेही असो.कोणत्याही देशामध्ये व्यक्तीस्वातंत्र्य खुप महत्वाची असते आणि त्यात अभिव्यक्ती स्वातंत्र्य खुपच.पण देशात विद्यार्थीसहीत लोकांना आवाज दाबला जातोय का?लोकांना त्यांचे विचार मांडण्यावर बंधन येत आहेत का?संध्या देशात जे वातावरण आहे यावर लोक का व्यक्त होत नाहीत?(अर्थात कोणी त्यावर व्यक्त होउ नये अशी आज परिस्थिती आहे ती गोष्ट वेगळी.!)प्रत्येकीला तो संवैधानिक अधिकार आहे.आणि डॉ.बाबासाहेबांच्या मते ” एखादं शासन टिकण्यापेक्षा लोकांचे अधिकार टिकणे खुप जास्त जरुरीचे असते”.भारताच्या तरुणांविषयी डॉ.बाबासाहेबांना खुप अपेंक्षा आहेत.पण आज आपल्या तरुणांची मानसिकता काय आहे? ” मी ,माझी पत्नी,बाला ,बाली अन दहा बाय दहाची खोली “.अशी मानसिकता दिसत आहे.स्वार्थीपणा वाढतांना आज दिसत आहे.सर्वकडे माणुस दिसत आहेत पण माणुसकी दिसत नाही आहे.विद्यार्थांनी स्वतबरोबरच आपल्या देशाचाही विचार करायला हवा.तरुणां प्रत्येकाने नेहमी लढले पाहीजे.संघर्ष केला पाहीजे.त्यामुळेच व्यक्ती बलवान बनते.डॉ.बाबासाहेबांना असा भारत अपेंक्षित आहे की जेथे तथागत बुद्धांचे विचार असतील.बुद्धांचे विचार जे की समता,स्वातंत्र्य,बंधुत्व आहेत जे की आपल्या संविधाचा गाभा आहे ते प्रत्येक भारतीयांच्या आचरणात त्यांना पाहीजे आहे.म्हणुनच त्यासाठी त्यांनी म्हटले आहे की ‘मी संपुर्ण भारत बौद्धमय करीन” आज आपण पाहतो की जर कोणाला विचारले तर तु कोन तो सांगतो अमुक जातीचा तमुक धर्माचा,वगैरे वगैरे.पण डॉ.बाबासाहेब म्हणतात की I am first Indian And Indian at the end And Nothing In between..!हा विचार आपण स्विकारला पाहीजे.
आपण प्रथमता भारतीय आहोत अंतिमता भारतीय आहोत आणि याशिवाय काहीच नाही आहोत.म्हणुनच डॉ.बाबासाहेबांनी संविधानाच्या उद्देशिकेत/प्रस्तावनेत “आम्ही भारताचे लोक” असे लिहले आहे.एखाद्या धर्माचे किंवा जातीचे नाही.आणि संविधानाला स्वत:प्रत अर्पण केले आहे इतर कोणालाही नाही. आपण भाषावाद,प्रांतवाद,जातीवाद,यासारख्या वादांना आपण जमिनीत गाढुन टाकले पाहीजे.आज”भारतामध्ये जग” दिसत आहे पण “जगामध्ये भारत” दिसत नाही आहे.महासत्ता व्हायचं जे स्वप्न आपण पाहीलं आहे ते आपल्यालाच तर पुर्ण करायचं आहे.डॉ.बाबासाहेबांनी सांगितलं आहे की” जेव्हा देवळात जाणार्या रांगा ग्रंथालयात जातील तेव्हा भारत जगावर राज्य करेल..!” आणि ते पुढे असेही म्हणतात की“पुस्तकाने माणसाचे मस्तक सशक्त होते आणि सशक्त झालेलं मस्तक कोणाचही हस्तक होत नाही आणि हस्तक न झालेलं मस्तक कुणापुढेही नतमस्तक होत नाही”.याचा आपण विचार जरुर करायला हवा.एकविसाव्या शतकात आपण आज आहोत.जुन्या जाचक रुढी परंपरा घेउन बसणं म्हणजे गाढवावर बसुन जग भ्रमण करण्याचं ठरवणं होय.डॉ.बाबासाहेब हा बोलण्याचा विषय नसुन तो आचरणाचा विषय आहे’.म्हणुन त्यांचे विचार आपण स्विकारुन प्रत्यक्ष आचरणात आणले पाहीजेत.आणि कोणताही देश म्हणजे एखाद्या जमिनीचा तुकडा नसुन तर लोकांची एकात्मता आणि माणसाच्या माणुसकीचे अस्तित्व होय.it is an easy to give an example but it is difficult to become an example…अमेरिका,रशिया महासत्तेचे आपण उदाहरण देतो पण स्वतच्या महासत्तेचे उदाहरण बनले आहोत का? याचा विचार आपण करायला हवा.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना त्याच्या देशातला शेतकरी हा संपन्न आणि आत्मनिर्भर पाहीजे आहे,त्यांचा विद्यार्थी हा भारतासाठी जगणारा पाहीजे आहे,भारतातले लोक त्यांना विञानवादी पाहीजे आहेत,भारतामध्ये समता स्वातंत्र्य,बंधुत्व,आणि सामाजिक न्याय त्यांना पाहीजे आहे,स्त्रियांचा संन्मान त्यांना लोकांनी केलेला हवा आहे,त्यांना जातीवाद नको आहे सर्व मानव जन्मताह: समान आहेत ,देश त्यांना महासत्ता हवा आहे लोकशाही आज जी ठोकशाही सामान्यांना वाटते ती “लोकांनी चालवण्यापेंक्षा ती लोकांसाठी चालवली जात आहे” असा विश्वास लोकांमध्ये हवा आहे. डॉ.बाबासाहेबांची लोकशाहीची व्याख्याच ” लोकांच्या सामाजिक,आर्थिक,राजकीय जिवनात क्रांतिकारक बदल घडवुन आणणारी शासनव्यवस्था म्हणजे लोकशाही होय” आज चित्र पाहीले तर देशाचे दोन भाग दिसतात.आजही गाव अप्रगत आणि फक्त शहराचा विकास होत आहे.ही विषमता आपल्याला नष्ट करावी लागेल.शहराबरोबरच आपल्याला गावांचाही विकास करावा लागेल.”स्मार्ट सिटी” बरोबरच “स्मार्ट व्हीलेजही” व्हायला हवे.शेती आणि शेतकर्याविषयी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी जे भाकित केले होते ते आजही लागु पडते किंबहुना त्याची गरज तेव्हापेक्षा जास्त आहे.डॉ.बाबासाहेब म्हणाले होते की “भारतीय शेती ही आजारी पडली आहे.शेतीसाठी शासनीने पुढाकार घ्यायला हवा. डॉ.बाबासाहेबांनी केलेलं भाकीत आज खरं होत आहे.शेतकरी आत्महत्या ही गंभीर समस्या बनली आहे.यासाठी तमाम शेतकर्यांनी आणि सरकारने डॉ.बाबासाहेबांनी जे विचार प्रदर्शित केले आहेत त्याचा अंगिकार करणे ही काळाची गरज झाली आहे.त्याचप्रमाणे डॉ.बाबासाहेबांच्या स्वप्नातला भारत निर्माण करायचा असेल तर त्यांचे विचार आपण स्विकारले पाहीजेत आणि तो प्रत्यक्षात आपल्याला निर्माण करायला हवा.हेच डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन असेल..!
" गाव कुसा बाहेरचा तुझा तो इतिहास,
गळ्यामध्ये मडकं अन झाडू तो कमरेस,
कफन मिळत नव्हतं र मेलेल्या मड्याला,
सुधरवल भिमान तुझ्या 17 पिढ्याला "
‘‘ जय भीम ,जय भारत ”
- प्रबुद्ध
संपर्क -: +91 86004 68358
जयक्रांती कला महाविद्यालय, लातूर