जिंदाबाद लातूरकर-कोरोनाचा धोका कमी होतोय.
लातूर - प्रतिनिधी
सध्या देशभरात कोरोनाला घेवून परिस्थिती गंभीर तर कुठे सौम्य असतानाच मागे लातूरमध्ये कोरोनाचे 8 पॉझिटिव्ह रूग्ण मिळाल्याने खळबळ उडाली होती.पण नवीन अहवालानुसार त्या
आठ पॉझिटिव्ह यात्रेकरू पैकी तीन व्यक्तीचे अहवाल हे निगेटिव्ह आले असुन त्यांच्यासोबत तपासणीसाठी पाठविलेल्या 26 कोरोना संशयितांपैकी 25 व्यक्तींचे अहवाल हे पुर्णपणे निगेटिव्ह आले आहेत. पैकी एकाचा अहवाल प्रलंबित आहे. नक्कीच ही लातूरकरांसाठी मोठी दिलासादायक बाब आहे. तसेच आजपर्यंत एकुण 43 व्यक्तींचा Home Quarantined कालावधी संपला आहे व इतर 53 व्यक्तींना जिल्हा आरोग्य विभागामार्फत Home Quarantined मध्ये निगराणीखाली ठेवण्यात आले आहे व इतर 11 व्यक्तींना Institutional Quarantined मध्ये ठेवण्यात आले आहे. तसेच 37 व्यक्तींना या संस्थेच्या विलगीकरणं कक्षात ठेवण्यात आले आहे अशी माहिती डॉ. मारुती कराळे (कोरोना विलगीकरण कक्ष प्रमुख तथा सहयोगी प्राध्यापक औषध वैद्यकशास्त्र विभाग )यांनी दिली.
सद्यस्थितीत जरी लातूरकरांना हा दिलासा मिळाला असला तरीही बेफिकीर राहू नये तसेच कोणीही घाबरून जाऊ नये. व अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. शासनाने दिलेल्या सूचनांचे वेळोवेळी पालन करावे. प्राथमिक तपासणी नंतर COVID-19 आजारा सारखी लक्षणे आढळल्यास किंवा कोरोना बाधित / संशयित व्यक्तींचा संपर्क झाला असेल तर अशा व्यक्तींना व प्रवाशांना विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था, लातूर येथील कोरोना विलगीकरण कक्षात तपासणीसाठी पाठविण्यात यावे असे आवाहन डॉ. गिरीष ठाकुर अधिष्ठाता, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था, लातूर यांनी केले आहे.