उदरगीर शहरात कोरोना बाधितांचा आकडा 21 वर
उदगीर - प्रतिनिधी
लातूर शहरात 8 प्रवासी मजुर कोरोनामुक्त होवुन परतल्यानंतरच्या कांही दिवसात उदगीर येथे एक कोरोनाबाधित स्री रूग्ण आढळली व तिचा उपचारादरम्यान मृत्युही झाला. आणि त्यानंतर उदगीर शहरात चौबारा भाग सीलबंद करण्यात आला व त्या महिलेच्या संपर्कातील व्यक्तींच्या तपासण्या घेतल्या गेल्या त्यातील 12 व्यक्तींच्या स्वैब नमुन्याचे अहवाल प्रलंबित होते. त्यापैकी 7 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.व 4 जणांचे अहवाल अनिर्णायक (inconclusive ) आहेत . या अनुषंगानी पुर्वीचे 14 व आताचे 7 मिळुन कोरोना बाधितांचा आकडा 21 वर जावुन ठेपला आहे. या पार्श्वभुमीवर वरील माहिती देत नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकुर यांनी केले.