खळबळजनक-लातूरजिल्हा्यात सहा कोरोना पॉजिटिव्ह रूग्ण

 


खळबळजनक -लातूरजिल्हा्यात सहा  कोरोना पॉजिटिव्ह  रूग्ण


लातूर :- प्रतिनिधि 


लातूर जिल्ह्यात केवळ उदगीर शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना आज उदगीर बाहेरही कोरोना पसरल्यामुळे लातूर जिल्ह्यातील नागरिकांची चिंता वाढवली आहे. आज लातूर जिल्ह्यात कोरना रुग्णांची संख्या सहाने वाढली आहे. यामध्ये उदगीर येथील तीन, जळकोट येथील एक आणि लातुरातील एक तर नागनाथ वढवळ ( चाकूर) येथिल एक  रुग्णांचा समावेश आहे .


विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत आज एकुण 78 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यापैकी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील 11 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले असून त्यापैकी 2 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून ते दोघेही मुंबई येथून प्रवास करून आलेले व्यक्ती आहेत . 09 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. उपजिल्हा रुग्णालय, उदगीर येथुन एकुण 9 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते . त्यापैकी 6 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन 3 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जळकोट येथील एका व्यक्तींचे स्वॅब तपाणीसाठी आला होता त्या व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.


बीड येथील 29 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्या 22 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असून 7 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत व उस्मानाबाद येथील 28 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी 25 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन 3 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत असे एकुण 78 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी 62 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन 16 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत अशी माहिती विषाणु संशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख तथा सहयोगी प्राध्यापक सुक्ष्मजीवशास्त्र विभाग डॉ. विजय चिंचोलकर व विलासराव देशमुख शासकीय विज्ञान संस्थेचे अधिष्ठाता, डॉ. गिरीष ठाकुर यांनी दिली.


आपली प्रतिक्रिया द्या