बीडचे जिल्हाधिकारी राहूल रेखावार व पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार झाले होम क्वारंटाईन |
बीड - प्रतिनिधी
राज्याचे सामााजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे हे कोरोना पॉझिटीव्ह आढळल्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या आधिकारी व इतर लोकांना विलगीकरण करण्याचे सत्र चालू झाले आहे. मंत्रीमहोदयाच्या कोरोना पॉजिटिवची बातमी कळल्यानंतर बीडचे जिल्हाधिकारी राहूल रेखावार हे तात्काळ होम क्वारंटाईन झाले होते.त्या नंतर आज पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार हे सुद्धा होम क्वारंटाईन झाले आहेत.याबबत सविस्तर वृत्त असे की, पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या समवेत जे पोलीस सुरक्षेसाठी होते त्यांच्या संपर्कात बीडचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार हे आले होते. तेव्हा त्यांनाही कोरोना संसर्गाचा धोका जाणवत असून इतरांवर याचा परिणाम होवू नये म्हणून यांनी होम क्वारंटाईन होण्याचा निर्णय घेतला आहे. बीडचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्यासह त्यांच्या स्टाफ मधले पाच जण कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर बीड जिल्ह्यातील अनेक अधिकारी आणि कर्मचार्यांच्या कोरोना तपासण्या झाल्या आहेत.त्यातील काहीजणांना क्वारंटान करण्याचे सत्र चालू आहे.