महावितरणाच्या हलगर्जीपणामुळे तरूणाचा मृत्यु.

महावितरणाच्या हलगर्जीपणामुळे तरूणाचा मृत्यु.


 


लातूर - प्रतिनिधी


25 - जुन 2020


 


देशभरातील सर्व शासकीय कार्यालयांची अवस्था एकसारखी झाली आहे.काही आधिकारी कर्मचारी याला अपवाद असतीलही पण बहुतांश सरकारी कर्मचारी हे आपल्या कामात टाळाटाळच करत असल्याचे दिसुन येतात. परिणामी जनतेला अनेक समस्यांना सामोर जावं लागत प्रसंगी आपल्या प्राणांचीही किंमत मोजावी लागते.लातूर शहरातील इस्लामपुरा भागात अशीच एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. विजेच्या तारांचा शॉक लागुन अवतारसिंग जुन्नी या 28 वर्षीय तरूण युवकाचा मृत्यु झाला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की , लातूर शहरात संजय नगर लगतच शासनाने म्हाडा योजनेअंतर्गत वसवलेल्या घरांची वसाहत आहे. या वस्तीत हातावर पोट असणारा शिकलकरी, पोपटवाले ( जोशी ) व मातंग  समाज राहतो. या वस्तीमध्ये महावितरणच्या वीज वाहुन नेणार्या तारा मागच्या वादळी पावसामुळे घरालगत अगदी खुप खाली आल्या आहेत .


या प्रकाराबाबत स्थानिक नागरिकांनी नगरसेवक व महावितरणच्या आधिकार्यांशी संपर्क साधुन त्या तारा योग्य त्या उंचीवर घेण्यास सांगितले मात्र संबंधित विभागाने आजपर्यंत टाळाटाळ केली परिणामी याच तारांचा शॉक लागुन अवतारसिंगचा मृत्यु झाला. त्याच्या पश्चात त्याचे वयोवृद्ध आईवडिल, पत्नी व चार मुली व एक मुलगा आहे. वडीलांना लकवा झालेला. या पार्श्वभुमीवर काही सामाजिक संघटनांनी जेव्हा महावितरणचे मुख्य कार्यकारी आधिकारी श्रीयुत सांगळे यांच्याशी संपर्क साधला तेव्हा शासनाच्या वतीने घटनेचा पंचनामा करून महावितरणची चुक आढळुन आली तर नियमाप्रमाणे मृताच्या नातेवाईकास मोबदला देण्याचे आश्वासन दिले.पण चर्चेदरम्यान तारांच्या खाली तुम्हांला घर बांधण्यास कुणी सांगितले अशाप्रकारे उर्मटपणाची भाषाही श्रीयुत सांगळेने मृताच्या नातेवाईकासोबत बोलताना वापरली . यानंतर  आतातरी वीजेची लाईन योग्य त्या उंचीवर घ्यावी अशी माफक अपेक्षा मृताच्या नातेवाईकानी महाराष्ट्र जीवनशी बोलताना केली.