अरविंद बनसोड प्रकरणासह विविध मागण्यांचे जिल्हाधिकार्यांना निवेद

अरविंद बनसोड प्रकरणासह विविध मागण्यांचे जिल्हाधिकार्यांना निवेदन 


 


लातूर - प्रतिनिधी


 


मागच्या काही दिवसापासुन सामाजिक प्रसारमाध्यांवर अरविंद बनसोड नावाच्या आंबेडकरवादी तरूणाच्या हत्येमुळे मोठ्या प्रमाणात असंतोष व्यक्त केला जात आहे. दि. 27 मे रोजी दलित तरूण अरविंद बन्सोड व त्याचा सहकारी मित्र गजाजन राऊत हा स्थानिक गैस एजन्सीत कामानिमित्त गेले असताना गैस एजन्सीच्या नंबरचा फोटो काढत असल्याच्या निमित्ताने तेथील कर्मचार्यांचा व अरविंदचा वाद झाला . प्रथम झालेली बाचाबाची व पुढे झालेल्या मारहाणीत अरविंद बन्सोड या तरूणाचा मृत्यु झाला. यात मारहाण करणारा व ज्याची ही गैस एजन्सी आहे तो मिथिलेश उमरकर हा गृहमंत्री अनिल देशमुख यांचा निकटवर्तीय आहे. तसेच राष्ट्रवादी पक्षाचा सक्रिय पदाधिकारी आहे.या पार्श्वभुमीमुळे अरविंदची हत्या एक आत्महत्या दाखवण्याचा व मारेकर्यांना संरक्षण देण्याचा प्रयत्न झालेला आहे. असा अरविंदचा कुटुंबियांचा दावा आहे. तेव्हा अरविंद प्रकरणातील आरोपी मिथिलेश उमरकर याला तात्काळ अटक करण्यात यावी, तसेच सागर शेजवळ हत्याकांडातील आरोपींचा पैरोल जामीन रद्द करावा, मांगवडगाव येथील तीन पारधी मजुरांच्या हत्येची केस सरकारी खर्चाने जलदगती न्यायालयात चालविण्यात यावी. इ मागण्यांचे निवेदन भीम आर्मी एकता मिशन लातूरच्या वतीने जिल्हाधिकार्यांमार्फत शासनाला देण्यात आले. यावेळी भीमआर्मी महाराष्ट्र प्रदेशसंघटक अक्षय धावारे , जिल्हाध्यक्ष विलास चक्रे, प्रसाद ढगे , बबलु शिंदे, बबलु गवळी, साधु गायकवाड, शेखर कांबळे, मुस्तफा सय्यद आदी उपस्थित होते.