अंनिसचे ऑनलाइन जिल्हा प्रशिक्षण शिबीर

अंनिसचे ऑनलाइन जिल्हा प्रशिक्षण शिबीर 



लातूर - प्रतिनिधी 


   (15-6-2020) 


महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धा निर्मुलन समिती समाजातील अंधश्रद्धा दुर व्हाव्यात व सुदृढ विवेकी समाजाची निर्मिती व्हावी म्हणुन गेली 30 वर्ष सातत्याने व अविरतपणाने काम करत असते. व या भुमिकेच्या प्रचारा व प्रसारासाठी महाराष्ट्र अंनिस आपल्या कार्यकर्त्यांसह विविध उपक्रमाचे आयोजन करत असते. या उपक्रमाअंतर्गतच अंनिसतर्फे 16 जुन 2010 ते 23 जुन 2020 दरम्यान गुगल मीटअप द्वारे ऑनलाइन जिल्हा प्रशिक्षण शिबीराचे आयोजन केले आहे. या शिबीराचे उद्घाटन महाअंनिसचे राज्यकार्याध्यक्ष अविनाश पाटील यांच्या हस्ते होणार असुन पुढील सात दिवस गुगल मीटअप द्वारे विविध विषयावर मान्यवरांचे मार्गदर्शन होणार आहे.व उद्घाटनावेळी राज्य प्रधान सचिव माधव बावगे, सुशिला मुंडे, संजय बनसोडे, विनायक सावळे राज्य सरचिटणीस हरिदास तम्‍मेवार हे उपस्‍थित राहणार आहेत. विवेकवादी चळवळीचा प्रचार प्रसाराबरोबरच सुशांत सिंगच्या आत्महत्येच्या पार्श्वभुमीवरही हे शिबीर महत्वाचे ठरते. शिबीराच्या माध्यमातुन नवीन कार्यकर्त्यांना भुमिकेची ओळख , जुन्या कार्यकर्त्यांमध्ये संवाद स्थापन करणे आदी ऑनलाइन शिबीराचे उद्देश्य असुन अंनिसच्या नेहमीच्या उपक्रमाचाच हा भाग असुन जास्तीत जास्त कार्यकर्त्याच्या सहभाग शिबीरात अपेक्षित आहे. असे अंनिसच्या रूकसाना मुल्ला यांनी महाराष्ट्र जीवनशी बोलताना सांगितले. शिबीराच्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यातील सर्व राज्‍य, जिल्‍हा, शाखांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्‍यांनी या व्हिडीयो कॉन्फ्रेसिंग वरती उपस्थित रहावे, असे आवाहन अंनिस जिल्हा कार्याध्यक्ष अनिल दरेकर व जिल्हा प्रधान सचिव बाबा हालकुडे, चंद्रकांत भोजने व सुधीर भोसले, जिल्‍हा विविध उपक्रम कार्यवाह, रमेश माने यांनी केले आहे.