लातूर शहरातील हातगाडा व्यापारी यांच्या हक्कासाठी आंदोलन

लातूर शहरातील हातगाडा व्यापारी यांच्या हक्कासाठी आंदोलन


 


लातूर- प्रतिनिधी


 


लातूर शहरातील गंजगोलाई परिसरात फळे व भाजीपाला विकणार्या हातगाडा व्यावसायिकांवर लॉकडाउनमुळे उपासमारीची वेळ आली आहे. लॉकडाउनच्या 5 व्या टप्प्यात बरेच आर्थिक व्यवहार सुरळीत झालेले असताना व फळे भाजीपाला या गोष्टी पूर्वी पासूनच अत्यावश्यक सेवेमध्ये असतानाही लातूर प्रशासन व म न पा प्रशासनाने हातगाडा व्यवसायिकांना गंजगोलाई परिसरात व्यापार करण्यास परवानगी दिलेली नाही. प्रशासनाच्या या अन्यायी धोरणा विरोधात स्वाभिमानी मुस्लिम विकास परिषद व हातगाडी व्यापार्यांच्या वतीने आंदोलन करण्यात आले. विविध चौकातील हातगाडी धारकास विक्रीची परवानगी द्यावी,रोटेशन पद्धत लावावी, हॉकर्सना विक्री प्रमाणपत्र द्यावे, फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करण्यात यावी या मागण्यांसाठी मनपा प्रशासनासमोर स्वाभिमानी मुस्लिम विकास परिषदेचे अध्यक्ष मोहसीन खान यांच्या अध्यक्षते खाली आंदोलन करण्यात आले. यावेळी शादूल शेख वसीम बागवान अदि फेरीवाले उपस्थित होते..