मालमत्ता कर माफ करण्यासाठी नागरिक हक्क कृती समितीचे लातूर मनपा ला निवेदन
लातूर - प्रतिनिधी
कोरोनापासुन वाचण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणुन लॉकडाउन केल्यामुळे सर्वांचेच आर्थिक गणित बिघडले आहे. तरीही लातूर महानगरपालिका मालमत्ता कराची वसुली करत आहे. मागे कोरोना महाआपत्तीमुळे 30 जुन पर्यंत मालमत्ता कराची थकबाकी जमा करण्यासाठी नागरिकांना अवधी दिला होता. पण व्यावसायिक व नागरिकांची आताची आर्थिक परिस्थिती पाहता 30 जुनलाही मालमत्ता कराची रक्कम मनपा ला जमा करणे लोकांना शक्य नाही. या पार्श्वभुमीवर लातूर महानगरपालिकेने चालु आर्थिक वर्ष 2020 -21 चा मालमत्ता कर पुर्णपणे माफ करावा , तसेच थकीत करावर कसल्याही प्रकारे व्याज वा दंडाची आकारणी करू नये व थकीत कराचा भरणा करण्यास इथुन पुढे सहा महिन्याची मुदतवाढ द्यावी. अशा मागण्यांचे निवेदन नागरिक हक्क कृती समितीच्या वतीने म न पा आयुक्त देविदास टेकाळे यांना देण्यात आले. यावेळी लातूर शहरातील जेष्ठ विधीज्ञ Adv. उदय गवारे , बसवंत भरडे, दिनेश गिल्डा, Adv. अजय कलशेट्टी , श्रीकांत देशपांडे , हेमंत जाधव आदि उपस्थित होते