वाळुमाफियांचा पर्दाफाश

लातूर शहरातील सर्वात मोठी वाळुतस्करी पकडली : महसुल प्रशासनाने केला वाळुमाफियांचा पर्दाफाश



 


लातूर - प्रतिनिधी 


28 जुन 2020


आज राज्यामध्ये वाळुवाहतुक पुर्णपणे बंद आहे. वाढती लोकसंख्या , ग्रामीण भागातील लोकांची सातत्याने शहराकडे होणारे स्थलांतर व एवढ्या मोठ्या समुदायाला राहण्यासाठी घराची वाढती गरज, त्याबरोबर बाजरपेठातील इमारतीचे बांधकाम व या सर्वांच्या मध्यवर्ती असणारा घटक वाळु. या वाळुच्या उपस्यावर व वाहतुकीवर शासनाने अनेक कारणानी निर्बंध लादले गेलेले आहेत. पण तरीही शासनाचे निर्बंध झुगारून वाळुमाफिया नफ्यासाठी सातत्याने वाळुउपसा व वाळुची तस्करी करतच असतात. आज लातूर शहरामध्ये वाळुतस्करीची एक मोठी घटना समोर आली. शहरातील मळवटी रोड खणी परिसरात 6 -7 ब्रास प्रत्येकी वाळु वाहुन नेणारे 16 हायवा ट्रक वाळु धुण्याच्या उद्देशाने आल्याची माहिती महसुल प्रशासनाला मिळाली .


ही माहिती मिळताच तहसीलदारांच्या आदेशानुसार पथक प्रमुख व नायब तहसीलदार श्रीयुत जाधव व श्रीयुत उगीले यांच्यासह 28 जणांनी संबंधित वाळुतस्करांवर छापा मारला. ट्रकना जाण्यासाठी एकाच बाजुने रस्ता असल्यामुळे समोरूनच प्रशासनाच्या गाड्या आल्या व वाळुतस्करांची नाकेबंदी झाली. मात्र वाळुतस्करांनी आपल्या ट्रकमधील वाळु ठिकठिकाणी उलथुन ट्रक एम्टी दाखवण्याचा प्रयत्न केला. या ट्रकमध्ये सुमारे 12 लाखापर्यंतची वाळु बंद होती असा प्रशासनाचा अंदाज आहे.   आज वाळुमाफियांवर तर धरपकडीची कार्यवाही झाली आता पुढची कार्यवाही काय होईल याकडे जनतेचे लक्ष लागुन आहे.


(Above content is secured with copyright law. all right reserved to Maharashtra jivan news)