परळीत आज 4 कोरोना पाॕझिटिव्ह

परळीत आज 4 कोरोना पाॕझिटिव्ह



 


परळी- प्रतिनिधी 


July 13, 2020


 


परळीतील त्या घटनेनंतर एसबीआय बैंकेच्या संपर्कात आलेल्या जवळपास 1500 कोरोना संशयित नागरिकांची तपासणी आरोग्य विभागाच्या वतीने तातडीने घेण्यात आली सलग दोन दिवस त्यांच्या प्रक्रिया वेगाने सुरू होती.यामध्ये जवळपास861 नागरिकांचे स्वॕब घेण्यात आले होते.त्या प्रकरणात काल पाठविलेल्या 481 जणांचा रिपोर्ट आज सोमवारी सकाळी प्राप्त झाला असुन त्यापैकी चार पाॕझिटिव्ह रुग्ण या पार्श्वभुमीवर


काल पाठवलेले 481 स्वैब नमुन्यापैकी 476 नमुने निगेटिव तर 04 नमुने पाॕझिटिव्ह आले आहेत व एका व्यक्तीच्या स्वैब नमुन्याचा अहवाल अनिर्णीत आहे. परळी उपजिल्हा रूग्णालयातर्फे आजपर्यंत घेण्यात आलेल्या 1454 लोकांच्या कोविड केसेसपैकी 1429 केस या निगेटिव आहेत तर 34 केसेस या positive आल्या आहेत. यापैकी सध्या 31 कोरोना एक्टीव्ह केसेस असुन 03 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोना प्रसाराच्या या वाढत्या पार्श्वभुमीवर प्रशासन नागरिकांना स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्याचे व शक्यतो घरीच राहण्याचे आवाहन करत आहे.