दिलासादायक ! आज दिवसभरातच कोरोनाचे 7188 रुग्ण बरे होऊन घरी परतले.
मुंबई - प्रतिनिधी
दि.२१ जुलै 2020
जगभरात कोरोना धुमाकुळ घालत आहे. खरतर आपलं सर्वकाही कोरोनानेच व्यापलय. पण या नकारात्मक वातावरणातच मनाला हलकासा दिलासा देणारी घटना समोर आली आहे. महाराष्ट्रामध्ये कोरोनाबाधेनंतर उपचार घेत असणार्या रूग्णांपैकी आज 7188 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण
55.72 % इतके असून आतापर्यत एकूण संख्या 1 लाख 82 हजार 217 झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या 8369 नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात 1 लाख 32 हजार 236 रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १६ लाख ४० हजार रूग्णांच्या ६४४ नमुन्यांपैकी ३ लाख २७ हजार ०३१ नमुने पॉझिटिव्ह (१९.९३ टक्के) आले आहेत. राज्यात ७ लाख ७९ हजार ६७६ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४५ हजार ७७ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
राज्यात आज २४६ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.७५ टक्के एवढा आहे. तेव्हा या पार्श्वभुमीवर नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी व प्रशासनाच्या सुचनांचे पालन करावे असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले