स्वस्त धान्य दुकानदाराकडुन नागरिकांची पिळवणुक : दुकान क्र.9 वर कायदेशीर कार्यवाही करण्याची नागरिकांची मागणी

स्वस्त धान्य दुकानदाराकडुन नागरिकांची पिळवणुक : दुकान क्र.9 वर कायदेशीर कार्यवाही करण्याची नागरिकांची मागणी



 


लातूर - प्रतिनिधी 


14 जुलै 2020


 


लातूर जिल्ह्यात मा. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाप्रमाणे दि.15 जुलै ते 30 जुलै दरम्यान संपूर्ण लॉकडाउन जारी केले असुन 24 मार्चपासुन देशात आरोग्यविषयक आणीबाणी लागु आहे. या पार्श्वभुमीवर सामान्य लोकांना पुरेसे अन्नधान्य मिळणे गरजेचे आहे . तशा स्वरूपाचे निर्देश सर्व पुरवठा विभागाने संबंधित स्वस्त धान्य दुकानाना दिले आहेत. मात्र काही दुकानचालक 


 नागरिकांना व्यवस्थित रेशन पुरवठा करत नसुन या बाबतच्या असंख्य तक्रारी नागरिकांतुन महाराष्ट्र जीवनपाशी आल्या या प्रकरणाची शहानिशा करून लोकांच्या आवाजाला वाचा फोडण्यासाठी चैनलचे प्रतिनिधी घटनास्थळी गेले असता तिथे स्वस्त धान्य दुकानदार हा नागरिकांना नियमाप्रमाणे धान्य देत नसल्याचे दिसुन आले. या संदर्भात प्रतिक्रिया विचारली असता, स्वस्त धान्य दुकान क्र 9 चे दुकानचालक श्रीयुत स्वामी हे नागरिकांना नियमाप्रमाणे धान्य देत नाहीत. तसेच धान्य घेण्यासाठी आलेल्या महिला व गोरगरीब सामान्य व्यक्तींला अरेतुरेची भाषा वापरतात तसेच शासनाकडुन मिळणारे धान्य कुणाला जास्त तर कुणाला कमी देणे. तसेच धान्याची साठेबाजी करून घाऊक बाजारात धान्य विकणे असे प्रकार सर्यास. चालवले जातात. आम्हांला न्याय मिळाला पाहिजे अशी संतप्त प्रतिक्रया रेशन धारकानी महाराष्ट्र जीवनशी बोलताना दिली. या संदर्भात पुरवठा विभाग संबंधित रेशन दुकान चालकावर कार्यवाही करणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागुन आहे.