शेतकऱ्यांना त्वरित आपल्या पिकाचा विमा उतरून घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

शेतकऱ्यांना त्वरित आपल्या पिकाचा विमा उतरून घेण्याचे प्रशासनाचे आवाहन



 


बीड - प्रतिनिधी


 दि.२१-जुलै-2020


 


देशातील शेतकरी कधी अस्मानी तर कधी सुल्तानी संकटांना तोंड देत असतो. संकटे काही सांगुन येत नाहीत म्हणुन शेतीपीकांना विम्याचे कवच आवश्यक असते. या अनुषंगानी यावर्षी 


प्रधानमंत्री पिक विमा योजना बीड


जिल्ह्यासाठी विशेष प्रयत्नाने मंजूर झाली असून आतापर्यंत बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी विमा भरण्याची अर्ज संख्या फक्त 1 लाख 78 हजार 976 इतकी असून आपले सरकार सेवा केंद्र तसेच विविध बँकांच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी


पिकाचा विमा उतरवून घ्यावा असे आवाहन राजेंद्र निकम जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बीड यांनी केले आहे .जिल्ह्यात सोयाबीन 77197, कापूस 23471,तूर 23620,मूग 20544,खरीप भूईमूग 11316 उडीद 7297, बाजरी 7671, मका 4214, कांदा 2786 आणि ज्वारी 90 असा पीकनिहाय प्राप्त अर्जांचा समावेश आहे. 


पिक विमा भरण्याची अंतिम मुदत दिनांक 31 जुलै 2020 असून यामध्ये कुठलीही मदत वा मिळणार नसल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. दरवर्षीचा अनुभव लक्षात घेता असे दिसून येते की शेतकरी अगदी शेवटची तारीख येईपर्यंत विमा उतरवत असतात. शेवटी शेवटी तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यास विमा उतरवणे शक्य होत नाही.


यासाठी शेतकऱ्यांनी शेवटच्या तारखेची वाट न पाहता लवकरात लवकर आपल्या पिकाचा विमा उतरून घ्यावा.शिरूर कासार तालुक्यातील तरडगव्हाण, आनंदवाडी, बीड तालुक्यातील पोखरी, पोखरी मैदा व बहिरवाडी, परळी तालुक्यातील खामगाव व मालेवाडी आणि माजलगाव तालुक्यातील शिंदेवाडी, सुलतानपूर व नित्रुड यासह काही गावांमध्ये ऑनलाईन पीक विमा भरण्यासाठी आपले सरकार केंद्रावर अडचणी येत आहेत. यासाठी आपले सरकार /सीएससी केंद्र धारकांनी त्यांच्या ब्राउजर मध्ये बदल करून गुगल क्रोम सारखे ब्राउझर वापरून हा प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न करावा, तसेच गावातील शेतकऱ्यांनी नजिकच्या बँकेमध्ये ऑफलाइन पद्धतीने विमा भरावा.


जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँका, सहकारी बँका व अन्य बँकानी विमा प्रस्ताव स्वीकारून शेतकऱ्याकडून विमा भरून घ्यावा व 31 जुलै या शेवटच्या तारखेनंतर विहित मुदतीत असे प्रस्ताव प्रचलित पद्धतीने विमा पोर्टल वर अपलोड करावे असे आवाहन करण्यात आले आहे.