भाग्यवंत वारकरी पेजच्या वतीने ऑनलाइन अभंगवाणी भजनाचा कार्यक्रम
आळंदी - प्रतिनिधी
25 July,
(आदिनाथ जाधव )
महाराष्ट्राला शेकडो वर्षापासुन वारकरी संप्रदायाच्या माध्यमातुन एक वैभवशाली आध्यात्मिक परंपरा राहिलेली आहे. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा या अभंगाप्रमाणे महाराष्ट्राचा नव्हे तर पंजाबापर्यंतचा माणुस पंढरीच्या विठुरायाच्या चरणी सुखी झालेला आहे. आणि या महाराष्ट्राच्या कुलदैवताजवळ जाण्याचं सशक्त माध्यम म्हणजे भजन . टाळ मृदंगाची साथ, विठुनामाचा गजर,गोपीचंदन आणि बुक्यानी न्हालेली भाळं आणि माउलीच्या कृपार्शिरवादाने सजलेला वैष्णव परिवार. पण हल्ली तरूण पिढीने हा वसा नाकारलाय की काय असं वाटण्याचे हे दिवस मात्र कोरोना महामारीच्या दिवसात आज लोकांना सर्वात जास्त मनःशांती व अध्यात्माची गरज असतानाच ही जबाबदारी घेतलीय महाराष्ट्रातील तरूण वारकर्यांनी. स्थळ काळाच्या मर्यादा ओलांडत व तंत्रज्ञानाचा आधार घेवुन या तरूण वारकर्यानी भाग्यवंत वारकरी या फेसबुक पेजवर उद्या दि. 26 जुलै रोजी ठीक 11 वाजता ऑनलाइन भजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे . हे भजन सादर करणार आहेत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायिका गु.ह.भ.प. भरतबुवा बडेकर यांची शिष्या कु. काजल सुरोशे व साथसंगत असणार आहे सुरेश कदम, आदित्य पवार ( तबला ) व मंगेश बुवा ( पखवाज) यांची. तेव्हा महाराष्ट्रातील तमाम विठ्ठलप्रेमी भाविकभक्तांनी या सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन भाग्यवंत वारकरी पेजच्या वतीने करण्यात आले आहे.